'नीट'चे निकाल जाहीर करा-सुप्रीम कोर्ट

'नीट'चे निकाल जाहीर करा-सुप्रीम कोर्ट

MBBS आणि BDS या वैद्यकीय अभ्याक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच नीट परीक्षा गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे. सीबीएसईने मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

  • Share this:

12 जून : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे  आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या निर्णयामुळे असंख्य विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने हे निकाल जाहीर करायला स्थगिती दिली होती. MBBS आणि BDS या वैद्यकीय अभ्याक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच नीट परीक्षा गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे. सीबीएसईने मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

महाराष्ट्रातून जवळजवळ पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. देशभरातील जवळपास साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. महाराष्ट्र सरकारने केवळ एमबीबीएस नव्हे, तर सर्वच वैद्यकीय प्रवेशांसाठी ‘नीट’चा गुणवत्ताक्रम लागू केला आहे.

नीट परीक्षा 10 प्रादेशिक भाषांतून घेतली घेते. इतर भाषांमधले पेपर्स इंग्लिशपेक्षा सोपे असतात, असा दावा एका विद्यार्थ्यानं केल्यानं मद्रास उच्च न्यायालयानं निकालांना स्थगिती दिली होती. हा निकाल 8 जून रोजी अपेक्षित होता. सुप्रिम कोर्टाच्या निकालानं अनेक विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.

पूर्वी बारावीच्या भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि  रसायनशास्त्र या तीन विषयांतील एकत्रित गुणांवर वैद्यकीय प्रवेश होत. १९९९पासून राज्यात सीईटी आली. २०१०ला ‘नीट’ची घोषणा झाली. २०१२मध्ये ती अचानक राबवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 11:45 AM IST

ताज्या बातम्या