नीरव मोदीने आणखी १७ बँकांना ३ हजार कोटींचा लावला चुना

नीरव मोदीने आणखी १७ बँकांना ३ हजार कोटींचा लावला चुना

हा घोटाळा करण्यासाठीही नीरव मोदीने 'लेटर ऑफ अंडरस्टँडिंग'चाच वापर केल्याचं समोर आलंय. नीरव मोदीनं केलेल्या फसवणुकीमुळे १७ बँकांचे सुमारे ३ हजार कोटी बुडाल्यात जमा आहेत.

  • Share this:

16 फेब्रुवारी : पीएनबी बँकेला ११ हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीने आणखी १७ बँकांना ३ हजार कोटींना गंडवल्याचे  समोर आले आहे. हा घोटाळा करण्यासाठीही नीरव मोदीने 'लेटर ऑफ अंडरस्टँडिंग'चाच वापर केल्याचं समोर आलंय. नीरव मोदीनं केलेल्या फसवणुकीमुळे १७ बँकांचे सुमारे ३ हजार कोटी बुडाल्यात जमा आहेत.

जून २०१५ मध्ये १७ बँकांनी नीरव मोदीच्या 'फायरस्टार इंटरनॅशनल' आणि इतर कंपन्यांसाठी १९८० कोटींचे कर्ज दिले होते. त्यानंतर 'लेटर ऑफ अंडरस्टँडिंग' मिळाल्याने हे कर्ज आणखी ५०० कोटींनी वाढवलं. या संपूर्ण कर्जापैकी ९० कोटी रुपये फायरस्टार कंपनीने परत केले होते अशीही माहिती समोर आलीय.

नीरव मोदीनं कोणत्या बँकेकडून किती कोटींचं कर्ज घेतलं होतं?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया १९४ कोटी

देना बँक १५३.२५ कोटी

विजया बँक १५०.१५ कोटी

बँक ऑफ इंडिया १२७ कोटी

सिंडिकेट बँक १२५ कोटी

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स १२० कोटी

युनियन बँक ११० कोटी

आयडीबीआय बँक १०० कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 11:29 AM IST

ताज्या बातम्या