'मदत हवीये..' दिल्लीतली परिस्थिती दाखवणारा अंगावर काटा आणेल असा VIDEO राहुल गांधींनी केला शेअर

'मदत हवीये..' दिल्लीतली परिस्थिती दाखवणारा अंगावर काटा आणेल असा VIDEO राहुल गांधींनी केला शेअर

दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने केजरीवालांवर टीका केली जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 9 जून : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरू आहे. जून-जुलैमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता वैज्ञानिकांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारकडून विविध तपासण्यांचा दावा केला जात असला तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.

त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ययय झा नावाच्या एका पत्रकाराचा व्हिडीओ आहे. या पत्रकाराने सरकारी मदत मिळत नसल्याचा दावा केला आहे. या पत्रकाराचं अख्खं कुटुंब कोरोनाबाधित झालं आहे. या कहरात त्यांच्या पत्नीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचं कुटुंब खूप दहशतीखाली आहे. बराच काळ त्यांच्या पत्नीच्या आईचा मृतदेह घरात होता. बराच काळ रुग्णालय प्रशासन आलं नाही, असे अजय झा यांनी सांगितले आहे. त्याची 9 व 5 वर्षांच्या मुलींनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्हाला मदत हवीये, उपचार हवेत, असं अजय झा या व्हिडीओत म्हणत आहेत. हा पत्रकार दिल्लीतील असल्याची शक्यता आहे. या व्हिडीओ शेअर करीत राहुल गांधी यांनी सध्याची परिस्थिती सांगण्यासह या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असा आशावाद दिला आहे.

यावर दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी यांनी अजय झा यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले आहे. दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हे वाचा-पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात चक्र फिरलं; रुग्णालयाजवळ आढळले पतीचे शव

संकलन, संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 9, 2020, 5:47 PM IST

ताज्या बातम्या