जम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख

जम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख

भारतीय सेनेने दोन वर्षांपूर्वी २९ सप्टेंबरला नियंत्रण रेषेच्या पलिकडे असणाऱ्या दहशतवादी ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राइक केले होते

  • Share this:

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर- नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवादी ठिकाणांवर अजून एक सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज असल्याचे विधान लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले. जम्मू- काश्मीरमध्ये सध्याची स्थिती पाहता खरंच अजून एका सर्जिकल स्ट्राइकची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले.

सोमवारी इंडिया टुडे या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जनरल रावत म्हणाले की, ‘अजून एक सर्जिकल स्ट्राइक करण्यात यावं असं मला वाटतं. पण आम्ही ते केव्हा आणि कधी करू याचा मला खुलासा करायचा नाही.’

भारतीय सेनेने दोन वर्षांपूर्वी २९ सप्टेंबरला नियंत्रण रेषेच्या पलिकडे असणाऱ्या दहशतवादी ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. पाकिस्तानशी कोणतीही बातचीत न करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन रावत यांनी यावेळी केले.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी म्हणाले की, ‘पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा करण्यास भारताने असमर्थता दर्शवली असली तरी, इस्लामाबाद परिसरात शांती प्रस्थापित करण्याचे आमचे प्रयत्न आम्ही थांबवणार नाहीत.’ वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानी दुतावासात पत्रकार परिषदेत बोलताना कुरैशी म्हणाले की, भारताने सप्टेंबरमध्ये ज्या शांतीविषयक चर्चेसाठी संमती दर्शवली होती, त्याला रद्द करण्यासाठी जुलैमध्ये घडलेल्या घटनेचा सहारा घेतला.

भारताने शुक्रवारी जम्मू- काश्मीरमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली. तसेच काश्मीरी दहशतवादी बुरहान वानीचे कौतुक करणारे पोस्ट स्टॅम्प जारी करण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानसोबत होणारी चर्चा रद्द केली होती.

VIDEO : लातूरमध्ये देशातील ड्रोन फार्मिंगचं पाहिलं प्रात्यक्षिक यशस्वी

First published: September 25, 2018, 2:01 PM IST

ताज्या बातम्या