भोपाळ 07 डिसेंबर: शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी (8 डिसेंबर) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी त्याला पाठिंबा दिलाय. आता भाजपच्या नेत्यांनी हे कायदे आणि सुधारणा या काँग्रेसच्याच नेत्यांनी सुचवलेल्या होत्या असा दावा केला आहे. 2011मध्ये शरद पवार यांनीच आपल्यालाला पत्र लिहून सुधारणा गरजेच्या असल्याचं सांगितलं होतं असा दावा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे.
चौहान म्हणाले, शरद पवारांनी पत्र लिहून APMC कायद्यात सुधारणा होणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. 2011मध्ये हे पत्र चौहान यांना लिहिलं होतं. APMC कायद्यात सुधारणा करून खासगी गुंतवणुकीला परवानगी दिली तर ते शेतकऱ्यांच्या फायद्याचं असेल असं पवारांनी म्हटलं होतं. असं असताना आता पवार त्या काद्यांना विरोध करत आहेत. ही त्यांची भुमिका दुटप्पी असल्याचंही चौहान यांनी म्हटलं आहे.
भाजपनेते आणि आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी आज देशभर पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस आणि भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर दुटप्पीपणाचा आरोप केलाय. आधी एक आणि आता एक अशी भूमिका ते घेत असून केवळ मोदी सरकारला विरोध करण्यासाठी वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Sharad Pawar Sahab wrote to me in 2011,"There's need to amend APMC Act on lines of model APMC act to encourage private sector investment in marketing, infrastructure & providing alternate competitive marketing channels in overall interest of farmers, consumers & agri trade":MP CM https://t.co/7gjw9wLO8L pic.twitter.com/R9RlW2R0bu
— ANI (@ANI) December 7, 2020
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांवर टीका केली होती. ते म्हणाले, शरद पवार यांनी 2010मध्ये अनेक पत्र लिहून कृषी सुधारणा सुचवल्या होत्या. शरद पवार यांच्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख. अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी असं पवार म्हणाले आहेत. डीएमकेनं 2016 साली असंच काही आश्वासन दिलं होतं. आप ने हे कायदे मंजूर केलेत. अकाली दल 12 डिसेंबर 2012 रोजी एपीएमसी दलालांचे अड्डे बनले आहेत असं म्हटले होते. राजकीय पक्षांचा विरोध म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.