पाकिस्तानचा दबाव भारताने धुडकावला, पायलटच्या सुटकेसाठी तडजोड नाही

पाकिस्तानचा दबाव भारताने धुडकावला, पायलटच्या सुटकेसाठी तडजोड नाही

कंदहार विमान अपहरणाच्या वेळी जसा भारतावर दबाव होता तसा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा डाव उलटविण्याची पूर्ण तयारी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : भारताचा पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि त्याच्या सुटकेसाठी भारताचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अभिनंदनच्या सुटकेसाठी भारतासोबत तडजोड करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न आणि दबाव धुडकावून लावले आहेत. अभिनंदनची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करा असं भारताने पाकिस्तानला बजावले आहे.

जिनिव्हा करारानुसार अभिनंदनला सोडणं पाकिस्तानला भाग आहे. पण त्या बदल्यात पाकिस्तानच्या काही अटी आहेत. भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने पाकिस्तानला आणखी हल्ल्याची भीती वाटतेय. त्यामुळे पाकिस्तान काही अटी घालण्याचा प्रयत्न करतेय. पाकिस्तानचा हा डाव भारताला माहित आहे. त्यामुळे अशी कुठलीही अट भारताला मान्य नाही.

कंदहार विमान अपहरणाच्या वेळी जसा भारतावर दबाव होता तसा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा डाव उलटविण्याची पूर्ण तयारी केली आहे.

पाकिस्तानचे संकेत

भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्तमान हे भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. 'भारतीय वैमानिकाची सुटका करण्याबाबत भारतासोबत खुल्या दिलानं तडजोड करायला तयार आहे,' असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं आहे. याबाबत पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिलं आहे.

'भारतीय वैमानिक आमच्याकडे सुरक्षित आहे. पाकिस्तानी लष्कर एक जबाबदार लष्कर असून आम्ही लष्करी संकेतांचा आदर करतो,' असं शाह मेहमूद यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळलं की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू,' असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी याआधी केलं होतं. पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान या वैमानिकाला बुधवारी ताब्यात घेतलं आहे.

First published: February 28, 2019, 3:22 PM IST

ताज्या बातम्या