नवी दिल्ली, 30 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं असताना तब्बल 15 वर्षानंतर जेडीयुला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये जेडीयुचे नेते मंत्री होते. 2014मध्ये दिल्लीत NDAचं सरकार आलं. तर, नितीश कुमार हे बिहारमध्ये मुख्यमंत्री झाले. शरद यादव हे NDAचे संयोजक म्हणून काम करत होते. त्यानंतर आता 15 वर्षानंतर जेडीयुला केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळत आहे. 2014मध्ये जेडीयु – भाजप विरोधात लढले होते. तर, 2019मध्ये दोन्ही पक्षांनी युती केली होती. त्यानंतर बिहारमध्ये भाजपसह मित्रपक्षांनी केलेली कामगिरी ही जबरदस्त अशी होती.
जेडीयुची स्थापना
1999मध्ये जेडीयुची स्थापना झाली. तर, एचडी देवेगौडा यांनी जनता दलापासून वेगळं होत जनता दल ( सेक्युलर )ची स्थापना केली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये जॉर्ज फर्नांडिस, नीतीश कुमार आणि शरद यादव यांना मंत्रिपदाची शपथ घेतली.
सेल्सगर्ल ते केंद्रीय मंत्री; मोदींच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्र्याचा खडतर प्रवास
जेडीयु – भाजपमध्ये बिनसलं
2014मध्ये भाजपनं लोकसभेच्या 22 जागा जिंकल्या होत्या. पण, त्यानंतर 2019मध्ये लोकसभेकरता सीट वाटप करताना भाजप बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायाला मिळालं. कारण, बिहारमध्ये देखील लोकसभेच्या जागा वाटप करताना भाजपनं जदयू समोर अर्थात नितीश कुमार यांच्यापुढे नमतं घेतलं होतं. नव्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी जदयू 17, भाजप 17 आणि रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी 6 जागा दिल्या होत्या. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 22, लोकजशक्ती पार्टीला 6 आणि भाजपविरोधात लढणाऱ्या जदयूला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या.
VIDEO: मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी 'या' मंत्र्याने धरले मुलीचे पाय