मोदी सरकारमध्ये कुणाला मिळणार मंत्रिपदं? सुषमा स्वराज, अरुण जेटलींचं काय होणार?

भाजपच्या खासदारांच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक घेणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जेडीयूचे नेते नितिशकुमार यांच्यासोबतच आणखीही नेते या बैठकीत असतील. एनडीएच्या बैठकीत खातेवाटपाचाही निर्णय होऊ शकतो, असं बोललं जात आहे. त्यामुळेच कुणाला कुठलं मंत्रिपद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 04:30 PM IST

मोदी सरकारमध्ये कुणाला मिळणार मंत्रिपदं? सुषमा स्वराज, अरुण जेटलींचं काय होणार?

नवी दिल्ली, 25 मे : लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळाल्यानंतर आता सरकारस्थापनेची तयारी सुरू आहे. नवी दिल्लीत आज संसदभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक होणार आहे. याआधी भाजपच्या नव्या खासदारांना नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. नवं सरकार बनेपर्यंत नरेंद्र मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करतील.

भाजपच्या खासदारांच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदी एनडीएच्या घटकपक्षांचीही बैठक घेणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जेडीयूचे नेते नितिशकुमार यांच्यासोबतच आणखीही नेते या बैठकीत असतील.

एनडीएच्या बैठकीत खातेवाटपाचाही निर्णय होऊ शकतो, असं बोललं जात आहे. त्यामुळेच कुणाला कुठलं मंत्रिपद मिळणार, एनडीएमधल्या घटकपक्षांना किती मंत्रिपदं मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा याबद्दल घटकपक्षांशी चर्चा करणार आहेत.शिवसेना आणि जेडीयूच्या खासदारांना महत्त्वाची मंत्रिपदं मिळू शकतात.

अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचं काय ?

माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याबदद्ल प्रश्नचिन्ह आहे. अरुण जेटली यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत अमृतसरहून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य बनले. तर सुषमा स्वराज यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.

Loading...

स्मृती इराणी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी ?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमधून पराभव केल्यामुळे स्मृती इराणी यांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, असा अंदाज आहे तर निर्मला सीतारमण यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी येऊ शकते.

अमित शहा यांचं मौन

नव्या सरकारमध्ये अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी दिली जाईल, असं बोललं जातं पण यावर अमित शहांनी मौन बाळगलं आहे. हा निर्णय भाजप आणि पंतप्रधान मोदी घेतील, असं  ते म्हणाले.

३० तारखेला शपथविधी

नरेंद्र मोदी यांनी याआधीच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना सरकारस्थापनेचं आमंत्रण दिलं. आता३० तारखेला मोदी सरकारचा शपथविधी आहे.

शपथविधीच्या आधी नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाऊन आईचे आशिर्वाद घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदारांचे आभार मानण्यासाठी जातील.

====================================================================================

संघाच्या मंचावर रतन टाटा? या आहेत आतापर्यंतच्या टॉप18 बातम्या


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 04:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...