NDAच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना 'मानाचं पान', नेते म्हणतात 'हम साथ साथ है'!

NDAच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना 'मानाचं पान', नेते म्हणतात 'हम साथ साथ है'!

मित्रपक्षांना भाजप विचारत नाही अशी सारखी टीका करण्यात येते. या स्नेहभोजनाने ती प्रतिमा पुसण्याचाही प्रयत्न भाजपने केलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 21 मे : Exit Pollमुळे उत्साह संचारलेल्या NDAच्या नेत्यांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी रात्री शाहीभोजन दिलं. दिल्लीतल्या प्रख्यात अशोका हॉटेलमध्ये मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांचा भाजपने अगत्याने पाहुणचार केला. फिर एक बार मोदी सरकार येणार असल्याने सर्वच नेत्यांच्या चेहेऱ्यावर त्याची झाक स्पष्ट दिसत होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बैठकीत मानाचं स्थान देण्यात आलं. अमित शहा यांच्या बाजूला उद्धव यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

रविवारी आलेल्या सर्वच Exit Polls मध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झाल्याने मतमोजणीच्या दोन दिवस आधी सर्व मित्र पक्षांना भाजपने हे स्नेहभोजन दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमात उपस्थित तर होतेच त्याचबरोबर सर्व नेत्यांचं आदरातिथ्यही करत होते. 23 मेला काय निकाल लागतील याची सर्वांना उत्सुकता असली तरी नेमकं काय होणार आहे याची दिशा सर्वांनाच कळाली आहे.

मित्रपक्षांना भाजप विचारत नाही अशी सारखी टीका करण्यात येते. या स्नेहभोजनाने ती प्रतिमा पुसण्याचाही प्रयत्न भाजपने केलाय. त्याचबरोबर बहुमतासाठी काही जागा कमी पडल्यास काठावरच्या पक्षांना योग्य तो संदेश जावा असाही भाजपचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई सुद्धा या भोजनाला उपस्थित होते.

'NDA' च्या या शाही डिनरसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच यावं असा आग्रह होता. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर तब्बल 8 वेळा फोन केले अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी अमित शहा यांनी पुरणपोळीचा मेन्यू ठरवण्यात आला आहे. शहा यांनी या शाही भोजनात 35 प्रकारच्या पदार्थांचा समावेश केला आहे. यात प्रत्येक नेत्यांच्या आवडी-निवडीचा विचार करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींसाठी खास गुजराती डीश ठेवण्यात आली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यासाठी खास बिहारी चोखा, सत्तू हा मेन्यू ठेवण्यात आला आहे. ईशान्येकडील नेत्यांसाठी खास त्यांच्या आवडीचे पदार्थ तर अकाली दलाच्या नेत्यांसाठी पंजाबी तडका असणारे पदार्थ ठेवण्यात आले आहेत.

First published: May 21, 2019, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading