या 5 कारणांमुळे JUDनं नाकारलं मंत्रिपद

या 5 कारणांमुळे JUDनं नाकारलं मंत्रिपद

nda government oath ceremony : JDUनं मंत्रिपद स्वीकारण्यास का दिला नकार?

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे : नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये 57 मंत्र्यांचा देखील समावेश करून घेतला. पण, JUDनं मात्र मोदी सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारण्यास नकार देत आपण NDAसोबतच असल्याचं स्पष्ट केलं. JDUनं मंत्रिपदाची ऑफर नाकारल्यानं दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं. त्यामागे काय कारणं असू शकतात? असा सवाल देखील आता विचारला जात आहे.

भागीदारी जास्त हवी

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं JUDसमोर नमतं घेत बिहारमध्ये जागांचं वाटप केलं होतं. बिहारमध्ये जेडीयुचे 16 खासदार आहेत. शिवसेनानंतर JDU भाजपचा दुसऱ्या नंबरचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे कमी मंत्रिपदं मिळत असल्यानं जेडीयु नाराज आहे.

मोदी 2.0: खातेवाटप जाहीर; एस.जयशंकर देशाचे नवे परराष्ट्र मंत्री!

दोन मंत्रिपदं हवीत

मंत्रिपद स्वीकरण्याबाबत भाजपनं जेडीयुची खूप समजूत काढली. पण, जेडीयु ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. किमान दोन मंत्रिपदं मिळावी अशी अट भाजपपुढे जेडीयुनं ठेवली. आरसीपी सिंह आणि ललन सिंह यांना मंत्रिपद देण्याचा विचार जेडीयुचा होता. यामध्ये जातीनिहाय देखील जेडीयुचा विचार होता.

मंत्रिपदाला जोडलं आत्मसन्मानाशी

रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही खासदार नसत्यांना एक मंत्रिपद दिलं गेलं. पण, जेडीयुला एकच का? असा सवाल जेडीयुच्या नेत्यांनी केला. मंत्रिपदाचा हा मुद्दा जेडीयुनं आत्मसन्माशी जोडल्यानं देखील जेडीयुनं एका मंत्रिपदाची ऑफर नाकारली.

भाजप नेत्याची हत्या; झोपेत असताना केला हल्ला

नेत्यांची असहमती

दिल्लीत जेडीयुच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एक मंत्रिपद स्वीकारण्यास JDUच्या नेत्यांनी असहमती दर्शवली.

अंतर्गत कलह

मंत्रिपदामध्ये आरसीपी सिंह आणि ललन सिंह यांची नावं चर्चेत होती. पण, नंतर ललन सिंह यांचं नाव मागे पडत गेलं. त्यामुळे जेडीयुला अंतर्गत कलहचा सामना करावा लागला असता. परिणामी, अंतर्गत कलह टाळण्यासाठी JDUनं एक मंत्रिपदाची ऑफर नाकारली.

VIDEO : प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेणार? काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

First published: May 31, 2019, 12:55 PM IST

ताज्या बातम्या