निर्मला सीतारामन यांचा पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड!

निर्मला सीतारामन यांचा पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड!

निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांच्या नावे नवा रेकॉर्ड झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे : नरेंद्र मोदी सरकारमधील खाते वाटप जाहीर झालं. यावेळी निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. निर्मला सीतरामन यांनी अर्थमंत्रीपदाची जबाबदारी घेताच एक नवा रेकॉर्ड झाला आहे. कारण, अर्थमंत्रीपदाची जबाबदारी घेणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी देखील पहिल्या महिला संरक्षणमंत्री होण्याचा मान हा निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे. मनोहर पर्रिकर यांच्याकडून त्यांनी संरक्षणमंत्रीपदाचा पदभार घेतला होता.

विधानसभेआधी राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ, शरद पवार करणार बदल

सेल्सगर्ल ते संरक्षणमंत्री

राजकारणात येण्यापूर्वी निर्मला सीतारामन या सेल्सगर्लचं काम करत होत्या. त्यांचा सेल्सगर्ल ते संरक्षणमंत्रीपदापर्यतचा प्रवास खडतर असाच होता. निर्मला सीतारामन यांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. त्यामुळे त्यांचं बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. जेएनयु विद्यापीठातून त्यांनी एमए इकॉनॉमिक्सची डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी एमफिल केलं. त्यांचं लग्न हे डॉक्टर पराकाला प्रभाकर यांच्याशी झाली. जेएनयुमध्ये त्यांची ओळख झाली होती. डॉक्टर प्रभाकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर निर्मला सीतारामन लंडनमध्ये राहू लागल्या. लंडनमध्ये असताना निर्मला सीतारामन या एका दुकानामध्ये सेल्सगर्लचं काम करत होत्या असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सनं दिलं आहे. त्यानंतर त्यांनी PricewaterhouseCoopersमध्ये सीनिअर मॅनेजरची नोकरी केली.

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला काय मिळालं? 'ही' आहे संपूर्ण यादी

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी निर्मला सीतारामन यांना 2003 ते 2005 या काळात नॅशनल कमीशन फॉर वुमनच्या सदस्या राहिल्या आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रवक्ता म्हणून पक्षाची बाजू ठामपणे मांडली. त्यानंतर 2014मध्ये भाजप सत्तेत आलं आणि त्यांना कॅबिनेटमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. 2016मध्ये त्या राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्या.

देशाच्या पहिल्या संरक्षणमंत्री

गोवामध्ये भाजप सरकार बनवण्यासाठी मनोहर पर्रिकर यांना पुन्हा एकदा गोव्यात पाठवण्यात आलं. त्यानंतर 3 सप्टेंबर 2017 रोजी निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री झाल्या.

VIDEO : नाशिकची 'लेडी सिंघम', दरोडेखोरासोबत एकटीने दिली झुंज

First published: May 31, 2019, 2:13 PM IST

ताज्या बातम्या