मोदींचं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, रणनीतीचं 'हे' आहे कनेक्शन

मोदींचं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, रणनीतीचं 'हे' आहे कनेक्शन

नरेंद्र मोदी यांनी खातेवाटप करताना देखील पुढील राजकीय रणनीतीचा विचार केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जून : लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 57 मंत्र्यांना शपथ दिली. त्यानंतर 31 मे रोजी खातेवाटप देखील जाहीर करण्यात आलं. यामध्ये 3 राज्यांमधून 13 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यामुळे मोदी – शहा यांच्या निर्णयावर आता चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशमधून 9, महाराष्ट्रातून 7, हरियाणामधून 3 आणि झारखंडमधून 2 मंत्र्यांचा समावेश आहे. या राज्यांना एवढं झुकतं माप का दिलं जात आहे? असा सवाल आता विचारला जात आहे. मंत्रिमंडळाचं वाटप करताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी 3 राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार केला. महाराष्ट्रामध्ये देखील ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका असून सत्ता कायम ठेवण्याची रणनिती भाजपनं आखली आहे. तर, हरियाणा आणि झारखंडमध्ये देखील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपनं रणनीती तयार केली आहे.

मोदी सरकारची 12 कोटी शेतकऱ्यांना भेट! 3000 रुपयांचं पेन्शन मिळणार

महाराष्ट्रातील 7 मंत्री

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 7 जण आहेत. दरम्यान, मोदींनी जाहीर केलेल्या खाते वाटपामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे परिवहन मंत्रालय, प्रकाश जावडेकर -पर्यावरण मंत्री, अरविंद सावंत - अवजड उद्योग मंत्री, पियुष गोयल – रेल्वे मंत्री, संजय धोत्रे - मनुष्यबळ राज्यमंत्री, रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काँग्रेसच्या खासदारांची बैठक; कोणाच्या गळ्यात पडणार गटनेते पदाची माळ?

शिवसेनेचा अपेक्षाभंग

मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आज खातेवाटपही जाहीर झालं. या खातेवाटपामध्ये शिवसेनेला महत्त्वाचं खातं मिळेल आणि काही मंत्रिपदं मिळतील, अशी अपेक्षा होती पण सेनेची ही अपेक्षा फोल ठरली आहे.शिवसेनेकडून अरविंद सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांना रेल्वे मंत्रालयासारखं एखादं महत्त्वाचं पद मिळेल, अशी अपेक्षा होती पण अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला. त्यामुळे शिवसेनेचा अपेक्षाभंग झाला.

अवजड उद्योग मंत्रालय

अवजड उद्योग मंत्रालय हे खातंही महत्त्वाचं आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले असले तरी सेनेची नाराजी मात्र लपून राहिलेली नाही. मागच्या मंत्रिमंडळातही शिवसेनेचे अनंत गीते केंद्रात मंत्री होते आणि त्यांच्याकडेही अवजड उद्योग मंत्रालयच होतं. आताही याच पदावर शिवसेनेची बोळवण झाली.

VIDEO: मुंबईकरांचा गारेगार प्रवास महागला, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 09:56 AM IST

ताज्या बातम्या