दिल्ली, 10 मे: आपच्या नेत्या आणि उमेदवार आतिशी मार्लेना यांनी माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर गंभीर आरोप केले. गौतम गंभीर यांचे समर्थक काही पत्रकं वाटत आहेत. या पत्रकांमध्ये माझ्या जातीबाबत, माझ्या आई वडिलांबाबत, माझ्याबाबत अपशब्द वापरण्यात आले आहेत असा आरोप आतिशी यांनी केला आहे. हे सांगत असताना आतिशी मार्लेना यांना पत्रकार परिषदेत रडूही कोसळले. जी पत्रकं माझ्याविरोधात वाटली जात आहेत ती वाचणंही लज्जास्पद आहे असंही आतिशी यांनी म्हटलं आहे. 'ही पत्रकं मी वाटली, हे जर सिद्ध झालं तर राजकारण सोडून देईन', मात्र आतिशी यांनी ते सिद्ध करुन दाखवावं. 23 मे पर्यंत सिद्ध करू शकल्या नाहीत तर केजरीवाल यांनी राजकारणाचा राजीनामा देतील का? असं आव्हान गंभीरनं दिलं आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.