Home /News /national /

महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अकाउंटवरून मोदीविरोधी Tweet; महाराष्ट्रातून दिल्लीकडे जाताना झालं अकाउंट हॅक

महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अकाउंटवरून मोदीविरोधी Tweet; महाराष्ट्रातून दिल्लीकडे जाताना झालं अकाउंट हॅक

'मी महाराष्ट्रातून परत येत असतानाच कुणीतरी खोडसाळपणा केला आहे', असं शर्मा यांनी सांगितलं आहे.

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्ष रेखा शर्मा (Rekha sharma)  यांचं अकाउंट हॅक झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात Tweet केलं गेलं. 'मी महाराष्ट्रातून परत येत असतानाच कुणीतरी खोडसाळपणा केला आहे', असं शर्मा यांनी सांगितलं आहे. याविरोधात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या 'आयटेम' कमेंटबद्दल तीव्र आक्षेप घेत निवडणूक आयोगापर्यंत तक्रार नोंदवल्याबद्दल रेखा शर्मा चर्चेत होत्या. आता या Account Hacking प्रकरणामुळे पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्ष बातमीचा विषय झाल्या आहेत. रेखा शर्मांचं अकाउंट हॅक झाल्याची बातमी न्यूज नेशनने दिली आहे. आता रेखा शर्मांच्या अकाउंटमधली ट्वीट्स प्रोटेक्टेड असं स्टेटस दिसत आहे.  त्यामुळे नेमकं कुठलं ट्वीट हे खोडसाळपणाने केलं गेलं, हे समजू शकत नाही. याविरोधात आपण twitter India कडे तक्रार करणार असल्याचंही शर्मा यांनी लिहिलं आहे. "मी विमान प्रवासात असताना हे खोडसाळ ट्वीट केलं गेलं. महाराष्ट्रातून येत असताना हे झालं. मी समजू शकते असं का झालं असेल" असंही रेखा शर्मा यांनी लिहिलं आहे. शर्मा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या तरी त्या कायम भाजप धार्जिणी भूमिका घेतात, असा त्यांना विरोध करणाऱ्यांचा आरोप असतो. कमलनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही त्यांनी तातडीने प्रतिक्रिया देत आवाज उठवला होता. मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. त्यावरून राजकारण तापलं असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. इमरती देवी यांनी कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल केलाय. कमलनाथ हे तर कलंकनाथ आहेत. मी त्यांना राक्षस समजते अशी टीका त्यांनी केली. एका प्रसार सभेत कलमनाथ यांनी ‘आयटम’ असा उल्लेख केल्याने मध्य प्रदेशात वादळ निर्माण झालं होतं. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौन आंदोलन करत याचा निषेध केला आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Women

    पुढील बातम्या