शिवसेनेचा नाही तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री, काँग्रेसची नवी खेळी

शिवसेनेचा नाही तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री, काँग्रेसची नवी खेळी

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम असून आता राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी

दिल्ली, 11 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाला अभूतपूर्व असं नाट्यमय वळण लागलं आहे. सत्ता स्थापनेच्या खेळात सोमवारी अनेक घडामोडी घडल्या. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पाठिंबा देईल असं वाटत होते. मात्र अखेरच्या क्षणी सेना नेते राज्यपालांना भेटले पण त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा वेळेत मिळाला नाही. त्यातच राज्यपालांनी सेनेला सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी वेळ वाढवून देण्यास नकार दिला. सेनेची वेळ संपल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण मिळालं आहे. आता काँग्रेसचा निर्णय सकारात्मक आला तर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसह सरकार स्थापनेचा दावा करू शकते. पण त्यासाठीही शिवसेनेचं साहाय्य लागेल. हे तीन पक्ष एकत्र आले तरच सत्तास्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ उभारू शकतात.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रिपदासाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि काँग्रेस-सेना यांनी पाठिंबा दिला तर सत्तेत वाटाघाटी करताना दोन मुख्यमंत्री पदे असू शकतात. यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोघांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.

वाचा : सत्तास्थापनेच्या नाट्याचा हायव्होल्टेज ड्रामा, यासोबत 8 महत्त्वाच्या घडामोडी

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आमदार आग्रही होते. मात्र पक्षश्रेष्ठींकडून याबाबत वेगळीच भूमिका मांडली जात होती. सेनेच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचा मुद्दा काँग्रेससमोर होता. त्याशिवाय केंद्रात शिवसेना एनडीएसोबत सत्तेतसुद्धा होती. सेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देऊन काँग्रेसची अट मान्य केल्याचं म्हटलं जात होतं. तरीही सेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला प्राधान्या देण्याकडे काँग्रेसचा कल असल्याचंही समजते.

जाणून घ्या राष्ट्रपती राजवट कधी लागू होते आणि त्यानंतर राज्यकारभार चालतो कसा

भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर आता शिवसेनेच्या हातात सत्तेची दोरी आहे असं वाटत असतानाच चक्र फिरली आणि राज्याच्या राजकाराणाला अर्ध्या तासात ट्विस्ट मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निर्णयावर आता महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतरच निर्णय घेणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. शिवसेनेबरोबर जाण्यास सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका वाड्रा अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे.त्यामुळेच पाठिंब्याचं पत्र वेळेत मिळालं नाही. राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं काँग्रेसने कळवलं.

अभूतपूर्व! राज्यपालांचं राष्ट्रवादीला निमंत्रण; आता उरल्यात 2 शक्यता

वाचा : अर्ध्या तासांत कसं बदललं सत्तास्थापनेचं चित्र, राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल?

VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का? घटनातज्ज्ञ म्हणतात...

Published by: Suraj Yadav
First published: November 12, 2019, 8:00 AM IST

ताज्या बातम्या