S M L

गुजरातमध्ये राष्ट्रवादीची वेगळी चुल?

काँग्रेसने काल गुजरात निवडणुकीत पहिली यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करताना काँग्रेसने राष्ट्रवादीशी चर्चा केली नाही असं प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 20, 2017 12:30 PM IST

गुजरातमध्ये राष्ट्रवादीची वेगळी चुल?

 20 नोव्हेंबर: गुजरातमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी तुटणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवारांच्या यादीवरून वाद झाल्याची माहिती मिळते आहे.

काँग्रेसने काल गुजरात निवडणुकीत पहिली यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करताना काँग्रेसने राष्ट्रवादीशी चर्चा केली नाही असं प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वतंत्रपणे निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहे. गुजरातमध्ये 8 डिसेंबर आणि 13 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत राहुल गांधींनी काँग्रेससाठी जोरदाल प्रचार केला आहे. तर मोदींनीही गुजरात निवडणुकीसाठी प्रचार केला आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये कोण जिंकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close