मराठी बातम्या /बातम्या /देश /Lakhimpur Violence: 'जालियनवाला बागमध्ये जशी स्थिती होती तशीच परिस्थिती आज उत्तरप्रदेशात, घटनेची चौकशी व्हावी' : शरद पवार

Lakhimpur Violence: 'जालियनवाला बागमध्ये जशी स्थिती होती तशीच परिस्थिती आज उत्तरप्रदेशात, घटनेची चौकशी व्हावी' : शरद पवार

Lakhimpur Kheri ruckus: उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे.

Lakhimpur Kheri ruckus: उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे.

Lakhimpur Kheri ruckus: उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा शरद पवारांनी (Sharad Pawar) निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. लखीमपूर खेरी येथे एसयूव्ही गाडीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडण्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध करतो, या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, जे घडलं त्याची वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू होते. शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. जालियनवाला बाग हत्याकांडासारखीच परिस्थिती उत्तरप्रदेशात निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी

२६ जानेवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्यावर हल्ला केला गेला. त्यानंतर आता उत्तरप्रदेशात ही घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी भाजपची आहे. शेतकऱ्यांवरील हल्ल्यातून केंद्राची वृत्ती कळली आहे. देशभरातील शेतकरी याला उत्तर देईल. शेतकरी वर्ग एकटा नाहीये सर्व जनता बळीराजाच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जी पावलं उचलावी लागतील ती उचलू असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना चिरडताना दिसली SUV

गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, लखीमपूर खीरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान वेगळंच चित्र पाहायला मिळालं. याठिकाणी झालेल्या दंग्यात 8 जणांचा मृत्यू झाला. आपल्या बचावासाठी भाजप मंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचं म्हटलं जात होतं. आता या प्रकरणात एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये एक SUV गाडी शेतकऱ्यांच्या अंगावर घातली गेल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये गाडी कोण चालवत आहे, हे स्पष्ट दिसत नाहीये. या व्हिडीओच्या सुरुवातीला दिसतं, की काही शेतकरी रस्त्यावरुन चाललेले आहेत. इतक्यात मागून एक काळ्या आणि मिलिट्री रंगाची SUV येते आणि शेतकऱ्यांना मागून धडक देत पुढे निघू लागते. यात एक वयोवृद्ध शेतकरी दाडीच्या बोनटवर पडताना स्पष्ट दिसतो. हा व्हिडीओ फार स्पष्ट नाही. मात्र, ज्या पद्धतीनं ही गाडी पुढे जाते ते पाहून जाणवतं की शेतकऱ्यांनी चिरडून ती पुढे गेली आहे. घटनास्थळी एकच गोंधळ उडतो. काही लोक मागे रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचं दिसतं. इतक्यात मागून काळ्या रंगाची आणखी एक SUV येते आणि वेगात पुढे जाते.

First published:
top videos

    Tags: Farmer protest, Uttar pradesh, शरद पवार