• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • शरद पवारांचं एक पत्र आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना मिळालं बळ

शरद पवारांचं एक पत्र आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना मिळालं बळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पाठिंब्याचे पत्र (NCP Sharad Pawar Supports Mamata Banerjee) पाठवलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 1 एप्रिल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) आठ टप्प्यांमध्ये मतदान होत असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा विरोध नाकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पाठिंब्याचे पत्र (NCP Sharad Pawar Supports Mamata Banerjee) पाठवलं आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जींच्या प्रचार अभियानात जोर वाढला आहे. ममता बॅनर्जी यांनी देशातील 15 राजकीय पक्षांना पत्र लिहून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील बहुतांश राजकीय पक्षांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. काही राजकीय पक्ष तर थेट ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या रंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्रितपणे लढाई लढावी, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. हेही वाचा - '...तर विरोधी पक्ष तांडव करणार', लॉकडाऊनबाबत शिवसेनेनं राज्यातील जनतेसमोर मांडली स्पष्ट भूमिका काँग्रेसची पश्चिम बंगालमधील शक्ती बघता सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधी नारा बुलंद करावा, असं आवाहन करण्यात आलं होतं. 'निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पवारसाहेब जाण्याची शक्यता आहे,; अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे. 'तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षाच्या अध्यक्षांना समर्थन देण्याबाबत पत्रव्यवहार केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनाही पत्र प्राप्त झाले आहे. आमच्या पक्षाचा ममताजींना पाठिंबा आहे,' अशी माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 'शरद पवारसाहेबांचा 1 ते 3 एप्रिल असा पश्चिम बंगालचा दौरा होता. परंतु त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जाता येणार नाही. मात्र पवारसाहेबांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यास शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पश्चिम बंगालला जातील,' असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव हे देखील ममता बॅनर्जी यांच्या प्रचारात उतरले आहे. भाजपला कुठल्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी चंग बांधला आहे. त्यामुळे निवडणूक निकालात नेमकं काय होतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published: