दरम्यान, अंमली पदार्थ प्रकरणी फक्त बॉलिवूडच नाही तर उद्योगपती आणि श्रीमंतांची नावे देखील समोर आली आहेत. कोट्यधीश बिल्डर अशी ओळख असणाऱ्या करन सजनानी याला एनसीबीने बेड्या ठोकल्या. या करन सजनानी याच्या अटकेनंतरच विविध नावं समोर येऊ लागली. आधी मुच्छड पानवाला याचं नाव समोर आलं आणि आता समीर खान यालाही एनसीबीने अटक केली. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या तपासामध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली जात होती. मुंबईतील प्रसिद्ध पानवाला अशी ओळख असणारा मुच्छड पानवाला त्याचे पान फक्त मुंबईतच नाही तर जगातल्या अनेक ठिकाणी मागवले जातात. हायप्रोफाईल बिजनेसमॅनपासून बॉलिवूडच्या सेलिब्रेटीपर्यंत मोठा ग्राहकवर्ग असणाऱ्या मुच्छड पानवालाची एनसीबी ड्रग्स प्रकरणात चौकशी करणार आहे.ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक चे जावई ड्रग कॉर्टेल चे समीर खान ची नारकॉटिक ब्यूरो नी केली अटक, नवाब मलिक राजीनामा दो @BJP4Maharashtra pic.twitter.com/OMIduPgU5E
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 13, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.