• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • सुप्रिया सुळे पोहोचल्या दिल्लीच्या सीमेवर, आंदोलक शेतकऱ्यांची घेतली भेट

सुप्रिया सुळे पोहोचल्या दिल्लीच्या सीमेवर, आंदोलक शेतकऱ्यांची घेतली भेट

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हे विरोधी पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डरवर पोहोचला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : शेतकरी कायदा (agriculture act 2020) रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या (Delhi) सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या सुद्धा शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. विरोधी पक्षांच्या खासदारांचं एक शिष्टमंडळ हे गाझीपूरच्या सीमाभागात पोहोचलेला आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हे शिष्टमंडळ पोहोचला आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश आहे.  काँग्रेस शिवाय जवळपास 10 विरोधी पक्षाचे 15 पेक्षा जास्त नेते पोहचले आहे. LPG Price: ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती 2 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात विनायक राऊत,अनिल देसाई, अरविंद सावंत,राजन विचारे, प्रताप जाधव, कृपाल तुमाने आदींचा समावेश होता. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर इथं पोहोचले आहे. प्रियांका गांधी यांच्या ताफ्याला अपघात दरम्यान, प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये (Tractor rally) मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या अंत्ययात्रेला जात असताना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांच्या ताफ्याला अपघात झाला. एका पाठोपाठ अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्यात. सुदैवाने या अपघात प्रियांका गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. प्रियांका गांधी आपल्या ताफ्यासह आज सकाळी उत्तर प्रदेशातील रामपूरकडे रवाना झाल्या. प्रियांका यांच्या कारच्या वायपरमधील पाणी संपले होते, त्यातच कारची काच धुकट झाली होती. 'मुंबईचा नाही, हा तर वरळीचा अर्थसंकल्प', सपाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर निशाणा त्यामुळे समोर काही दिसत नसल्यामुळे चालकाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे पाठीमागून येत असलेल्या कार एकमेकांवर जाऊन आदळल्यात. पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना काहीच कळाले नाही, त्यामुळे एकापाठोपाठ गाड्या एकमेकांवर आदळल्यात. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, गाड्यांचे बरेच नुकसान झाले आहे.
Published by:sachin Salve
First published: