Home /News /national /

रोहित पवारांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भेट, दिले हे आश्वासन

रोहित पवारांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भेट, दिले हे आश्वासन


रोहित पवार यांनी नवी दिल्लीत जाऊन निर्मला सीतारामण यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील...

रोहित पवार यांनी नवी दिल्लीत जाऊन निर्मला सीतारामण यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील...

रोहित पवार यांनी नवी दिल्लीत जाऊन निर्मला सीतारामण यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील...

  नवी दिल्ली, 14  सप्टेंबर :  राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि  कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (ncp mla Rohit Pawar) दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील सुविधांची पूर्तता करणे आणि नुतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (nirmala sitharaman) यांची भेट घेतली आहे. रोहित पवार यांनी नवी दिल्लीत जाऊन  निर्मला सीतारामण यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली. कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण भागातील गरिबीचा सापळा तोडण्यात यशस्वी सिद्ध झाला आहे,  ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लिंग समानता सुधारणे, स्थानिक राजकारणात सहभाग वाढवणे, सार्वजनिक संपत्ती वाढवण्यास मदत झाली आहे. याच धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली. मोठी बातमी! देशातील 'या' टॉप IT कंपन्यांचं Work From Home होणार बंद; बघा लिस्ट तसंच, मतदारसंघात आर्थिक व्यवहारांसाठी बँकांची असलेली संख्या कमी आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये काही समस्यांना तोंड द्यावे लागते. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने सावकारकीला आला घालण्याचा प्रयत्न केला जातोय. या परिस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार याठिकाणी अधिक प्रमाणात वाढावे अशी विनंतीही रोहित पवार यांनी अर्थमंत्र्यांना केली. तर यावर, शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बँकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी निर्मला सीतारामण यांनी दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. हातात हिरवा चुडा अन् केसात मोगऱ्याचा गजरा; मराठमोळ्या लुकमध्ये दिसली जेनीलिया तसंच रोहित पवार दिल्लीमध्ये असताना केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचीही भेट घेतली. यावेळी USTTAD च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती नकवी यांना केला.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Nirmala Sitharaman, Rohit pawar

  पुढील बातम्या