‘दिल्ली हिंसाचार 2002 मधील गुजरात दंगलीसारखाच’, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा अमित शहांवर निशाणा

‘दिल्ली हिंसाचार 2002 मधील गुजरात दंगलीसारखाच’, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा अमित शहांवर निशाणा

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिल्लीतील हिंसाचाराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिल्लीतील हिंसाचाराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘दिल्लीमध्ये सुरू असलेला हिंसाचार, 2002 सालात गुजरातमध्ये जे काही घडलं त्या घटनांशी मिळताजुळता आहे’. त्याचप्रमाणे त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबतही शंका उपस्थित केली आहे.

ANI ला प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले की, ‘दिल्लीमध्ये सतत हिंसा सुरू आहे आणि यावेळी पोलीस दंगल घडवून आणणाऱ्यांच्या बाजुने उभे आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद आहे. देशाच्या राजधानीमध्ये अशी परिस्थिती असेल तर इतर देशामध्ये काय होईल? दिल्लीमध्ये सुरू असलेला हिंसाचार, 2002 सालात गुजरातमध्ये जे काही घडलं त्या घटनेशी मिळताजुळता आहे. 2002 गुजरात मॉडेलसाखंच हे एक प्रकारचं मॉडेल आहे’.

(हेही वाचा-दिल्ली हिंसाचारात 20 जणांचा मृत्यू, गृह मंत्रालयाने म्हटलं- सैन्याची गरज नाही)

त्याचप्रमाणे नवाब मलिक यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘प्रश्न असा आहे की गृहमंत्री अमित शाह यांनी कोणतीही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत की नाही?’असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, ‘जर सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली तर तर देशात अराजक पसरेल. अमित शहा यांना देशाला कोणता संदेश द्यायचा आहे हे त्यांना सांगावे लागेल. देशातील परिस्थिती बिघडवण्यामध्ये राजकीय हात आहे’.

(हेही वाचा-दिल्ली जळत असताना राहुल गांधी कुठे आहेत? कार्यसमितीच्या बैठकीला अनुपस्थित)

ईशान्य दिल्लीत CAA समर्थक आणि विरोधकांच्या निदर्शनादरम्यान व्यापक हिंसाचार झाला आहे आणि त्यामुळे आतापर्यंत  जवळपास 21 नागरिक ठार झाले आहेत.

First published: February 26, 2020, 1:11 PM IST

ताज्या बातम्या