मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्लीतली राष्ट्रवादीची बैठक संपली, मोदींविरोधात पर्याय देण्यासाठी ठरला नवा प्लॅन!

दिल्लीतली राष्ट्रवादीची बैठक संपली, मोदींविरोधात पर्याय देण्यासाठी ठरला नवा प्लॅन!

नवी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक पार पडली.

दिल्ली, 07 डिसेंबर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (ncp) काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पडली. या बैठकीत महाराष्ट्राबाहेर पाऊल ठेवण्याबाबत चर्चा झाली. तसंच, देशात भाजप (bjp) भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.  लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे, याबाबत देशात पर्याय तयार केला जाणार', असं राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी सांगितलं.

नवी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक पार पडली.या बैठकीला प्रफुल पटेल, नवाब मलिक, पितांबर मास्टर, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर नवाब मलिक यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

आजच्या बैठकीत 4 प्रस्ताव ठेवण्यात आले होते.  दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्यामुळे मोदी सरकारला 3 कृषि कायदे मागे घ्यावे लागले. हा पूर्णपणे शेतकरी लढ्याचा विजय आहे. त्यामुळे या लढाऊ शेतकऱ्यांचं पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. याआधीही आणि यापुढंही राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत कायम सोबत असणार आहे, असंही मलिक म्हणाले.

भूत बंगल्यात शिरताच तरुणाचा मृत्यू, काय खरं नी काय खोटं? रंगली चर्चा

देशात भाजप भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. भाजपकडून लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे. देशात महागाई वाढली आहे, त्यात धार्मिक भीती पसरवली जात आहे. त्यामुळे मोदी सरकारविरोधात लढा देण्यासाठी देशात पर्याय तयार केला जाईल, भाजप विरोधात सगळ्यांना एकत्र करून ताकद उभारली जाणार आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

कोरोनाच्या काळात बेरोजगारी वाढली. व्यापार ठप्प झाला, लोकांना नुकसान झालं, महागाई वाढली, महागाई बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे महागाई विरोधात आगामी काळात आंदोलन करणार आहोत, असंही मलिक यांनी सांगितलं.

लवकरच 5 राज्यांच्या निवडणूक जाहीर होतील. त्याबाबतही चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. गोवा, मणिपूर बाबतही चर्चा झाली आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

बॅन लिपस्टिक व्हिडिओ मागील सत्य अखेर आलं समोर, अनुराधाशी कनेक्शन

विशेष म्हणजे, मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मोदी सरकारविरोधात वेगळा पर्याय देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: NCP