महाराष्ट्रात घडणार का राजकीय भूकंप? पवार पुन्हा घेणार सोनियांची भेट

महाराष्ट्रात घडणार का राजकीय भूकंप? पवार पुन्हा घेणार सोनियांची भेट

पवार राज्यातल्या नेत्यांशी काय चर्चा करणार आणि पुन्हा सोनियांना कशासाठी भेटणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 4 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर प्रामुख्याने चर्चा झाली. सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेचं बिनसल्याने गेल्या 11 दिवसांपासून सत्ता स्थापन होऊ शकली नाही. त्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली.

भाजप आणि शिवसेनेचं फाटलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते अशीही चर्चा आहे. उघडपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनाला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावलीय. मात्र राजकारणात सर्व शक्यतांचा विचार केला जात असल्याने गरज पडली तर भाजपला एकटं पाडण्यासाठी राज्यात नवी समिकरणं तयार होऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर पवार आणि सोनिया गांधी यांची भेट महत्त्वाची मानली जातेय.

गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातले काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांना राज्यातल्या स्थितीची माहिती दिली होती. सोनियांशी भेट झाल्यानंतर पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. या भेटीच्या वेळी अजित पवार आणि प्रफुल पटेलही उपस्थित होते.

मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? काय म्हणाले संजय राऊत

पवार म्हणाले, मी सोनियांना महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीची माहिती दिली. राज्यात सध्या अस्थिरता आहे. त्या पार्श्वभूमीवर  आम्ही सगळी चर्चा केली. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला किंवा आम्ही त्यांना कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. राज्यात भाजपच्या विरोधी वातावरण आहे. शिवसेनेने 170 चा नंबर कुठून आणला ते माहित नाही. आमच्याकडे सत्ता बनविण्यासाठी संख्याबळ नाही. संजय राऊत आमच्याकडे 170चं सख्याबळ असल्याचं सांगत आहेत त्यावर बोलताना पवार म्हणाले त्यांच्याबरोबर बरोबर भाजपचा मोठा गट असावा. मुंबईत मंगळवारी पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर पुन्हा सोनियांशी भेटणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात होणार आहे.

BREAKING : शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात, बड्या नेत्याने केला खुलासा

त्यामुळे शरद पवारांनी आपले पत्ते अजूनही उघड केलेले नाहीत. तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार का या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितलं नसलं तरी त्यांनी अनेक संकेत दिले आहेत. पवार राज्यातल्या नेत्यांशी काय चर्चा करणार आणि पुन्हा सोनियांना कशासाठी भेटणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे.ज्यांना लोकांनी निवडणून दिलं त्यांनी तातडीनं सरकार बनवलं पाहिजे. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात पुन्हा परत जाणार का या प्रश्नावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं.

महाराष्ट्रात काय घडलं?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते रामदास कदम हेही सोबत होते. राज्यात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झालाय त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेणं याला महत्त्वाचं मानलं जातंय. राज्यपालांची भेट ही सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली. आम्ही एका मर्यादेत राहून चर्चा केली. लवकरात लवकरच सरकार स्थापन व्हावं अशी विनंती आम्ही केली. सरकार स्थापनेसाठी शिवसेना अडथळा ठरणार नाही असं आम्ही सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या वतीने आम्ही भेटलो. उद्धव ठाकरे यांची आणि बाळासाहेब ठाकरे यांची काही पुस्तकं आम्ही राज्यपालांना भेट दिली अशी माहितीही राऊत यांनी दिली. बाळासाहेबांचं फटकारे हे पुस्तकही राज्यपालांना दिली.

शिवसेनेच्या भूमिकेवर अमित शाह नाराज, मुख्यमंत्रिपदावर तडजोड नाही

राज्यात जो काही पेच निर्माण झाल त्यासाठी शिवसेना जबाबदार नाही असंही आम्ही त्यांना सांगितलं. राजभवन हे राजकारणाची जागा नाही. आम्ही राज्यपालांना सूचना देणार नाही. ते अतिशय अनुभवी नेते आहेत असंही राऊत यांनी सांगितलं. राज्यपालांसोबत 1 तास चर्चा झाल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? असा प्रश्न जेव्हा संजय राऊतांना विचारला गेला त्यावर राऊत म्हणाले, असं काहीही आम्ही सांगितलं नाही आणि कुणी आमच्या कानातही असं काही सांगितलं नाही. अशा गोष्टी आम्ही करत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'...सफर मे मजा आता है'

निवडणुकीच्या निकालानंतर 10 दिवस उलटून गेले तरी राज्यात सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. भाजप-शिवसेनेमध्ये अद्याप चर्चाच सुरू आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली आहे. तर भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. यामुळे दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंत पत्रकार परिषदेतून भाजपला थेट इशाराच दिला आहे. शिवतिर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान, सोमवारी संजय राऊत राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी केलेल्या ट्विटने पुन्हा नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 07:04 PM IST

ताज्या बातम्या