नवी दिल्ली, 27 जानेवारी : लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मोहम्मद फैजल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. खासदार मोहम्मद फैजल यांना नुकतेच केंद्रशासित प्रदेशातील एका न्यायालयाने हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यामुळे मोहम्मद फैजल यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं.
खुनाच्या प्रयत्नात दोषी असलेले लक्षद्वीपचे माजी खासदार मोहम्मद फैसल यांच्या पोटनिवडणुकीच्या अधिसूचनेला आव्हान दिल्याच्या प्रकरणात माजी खासदार मोहम्मद फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिका निकाली काढताना सांगितले की, निवडणूक आयोगाने असे म्हटले आहे की, केरळ उच्च न्यायालयाने माजी खासदाराच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आता निवडणूक आयोग सध्याच्या नियमांनुसार पुढील कारवाई करेल.
13 जानेवारी रोजी, लोकसभेच्या सरचिटणीसांनी एक अधिसूचना जारी करून त्यांना अपात्र घोषित केले होते, कनिष्ठ न्यायालयाने खासदाराला गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरवल्याच्या निर्णयानंतर 18 जानेवारी रोजी, निवडणूक आयोगाने एक प्रेस नोट जारी करून 27 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुकीची घोषणा केली. ज्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या फैजल यांना 2017 मध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून 11 जानेवारी रोजी लक्षद्वीप सत्र न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
वाचा - ठाकरेंसोबत युती होताच आंबेडकरांचा नामांतराचा विरोध मावळला, म्हणाले विरोध फक्त..
काय आहे प्रकरण?
2009 साली घडलेल्या प्रकरणात खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच चारही आरोपींना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मोहम्मद फैजल हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभेत त्यांनी लक्षद्विपच्या प्रश्नांवर अनेकदा रोखठोक भूमिका मांडली आहे. फैजल हे लोकसभेत निवडून आलेले सदस्य आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान झालेल्या वादाशी संबंधित आहे. लक्षद्वीपचे माजी लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी.एम. सईद यांचे जावई असलेले काँग्रेस नेते मोहम्मद सल्लेह यांच्यावर एका व्यक्तीने क्रूरपणे हल्ला केला होता. 2005 मध्ये मृत्यू होण्यापूर्वी सईद यांनी 10 वेळा लक्षद्वीपचे प्रतिनिधित्व केले. या क्रूर हल्ल्यात सल्लेह गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना विमानाने कोची येथील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
कोण मोहम्मद फैजल?
मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्विपमधील खासदार आहेत. ते 16 व्या लोकसभेत सदस्य म्हणून निवडून आलेत. 2014 मध्ये फैजल यांनी मुहम्मद हमदुल्ला सईद यांना हरवलं होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, Sharad Pawar