राष्ट्रवादीची 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून मान्यता जाणार? आयोगाची नोटीस

राष्ट्रवादीची 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून मान्यता जाणार? आयोगाची नोटीस

राष्ट्रवादी सोबतच, तृणमूल आणि भारतीय कम्युनिष्ट पक्षालाही आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्याची नोटीस दिलीय.

  • Share this:

नवी दिल्ली 18 जुलै : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर देशात अनेक राजकीय पक्षांना जोरदार धक्का बसला. लोकांनी धक्का दिल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही या पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिलीय. अशा पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. आयोगाने राष्ट्रवादीला आज नोटीस दिलीय. आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबर धक्का बसला. महाराष्ट्रात या दोनही पक्षांच्या फक्त 5 जागा आल्यात यात काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणूक आयोगाने सध्या देशातल्या सात पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा दिलाय.

अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊदच्या पुतण्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हे आहेत सात राष्ट्रीय पक्ष

भारतीय जनता पक्ष

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

भारतीय कम्युनिस्ट पक्ष

बहुजन समाज पक्ष

तृणमूल काँग्रेस

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या तरुणाची दादागिरी; पोलिसाने थेट कानशिलात लगावली

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी या गोष्टी आवश्यक

-निवडणूक आयोग 1968 च्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते.

-त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार पाहिजे.

-त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली पाहिजे.

-चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे.

सोलापूरमध्ये पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड? 'हे' 4 नेते युतीच्या वाटेवर

राष्ट्रीय पक्षांचा दर्जा तपासण्यासाठी नव्या नियमांनुसार पाच ऐवजी 10 वर्षांच्या कामगिरीचा विचार केला जातो.

राष्ट्रवादीचे चार खसादार निवडून आले असले तरी इतर नियमांची पुर्तता करणं पक्षाला जमलं नाही त्यामुळे पक्ष काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली की त्या पक्षाला कार्यालयासाठी मोठ्या शहरांमध्ये कमी किंमतीत जागा. देशभर एकच निवडणूक चिन्ह अशा अनेक सुविधा मिळत असतात.

First published: July 18, 2019, 3:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading