मराठी बातम्या /बातम्या /देश /

ANALYSIS: शरद पवारांना का लढवायची आहे लोकसभेची निवडणूक, हे आहे कारण!

ANALYSIS: शरद पवारांना का लढवायची आहे लोकसभेची निवडणूक, हे आहे कारण!

सुजय विखेंच्या उमेदवारीसंदर्भातील निर्णय प्रदेशाध्यक्षांनी घ्यावा- शरद पवार

सुजय विखेंच्या उमेदवारीसंदर्भातील निर्णय प्रदेशाध्यक्षांनी घ्यावा- शरद पवार

'2019 च्या निवडणुकी नंतर देशाचं राजकीय चित्र काय राहिल याचा अचूक अंदाज शरद पवारांना आला आहे.'

पुणे 08 फेब्रुवारी : माढ्याच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी स्वतः शरद पवारच पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चिन्हं आहेत. याआधी पवारांनी लोकसभेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर गेल्या चार वर्षात बरच पाणी पाहून गेल्याने पवार आपली घोषणा 'लोकआग्रहास्तव' फिरविणार अशीच शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे दोघेही इच्छूक आहेत. माढ्याच्या उमेदवारीचा तिढा सोडविण्यासाठी पवारांनी पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्याला  विजयसिंह मोहितेपाटीलही उपस्थित होते. पण याच बैठकीत विजयदादांनी आपल्याला माढ्यातून उभे राहण्यासाठी आग्रह केल्याचं पवारांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. देशमुख की मोहिते पाटील हा उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी जर समजा पवार खरंच माढ्यातून उभे राहिले तर तिथं पुन्हा एकदा 2009 सालची पुनरावृत्ती बघायला मिळेल अशी शक्यता आहे. त्यावेळीही मोहितेपाटील बंधूंमधला उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी पवारांनी हाच मार्ग अवलंबला होता.  माढ्याचं तिकीटं देशमुखांना दिलं तर मोहितेपाटील भाजपातून लढणार असल्याच्या चर्चा माढा मतदारसंघाच आहे.पण आता स्वतः पवारच मैदानात उतरणार म्हटल्यावर मोहितेपाटलांचं संभाव्य बंडही आपोआपच थंड होणार आहे. पवारांच्या प्रत्येक वक्तव्यामागे अनेक अर्थ दडलेले असतात. ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी पवारांच्या या संकेतांचा अर्थ सांगताना म्हटलंय की, ''2019 च्या निवडणुकी नंतर देशाचं राजकीय चित्र काय राहिल याचा अचूक अंदाज शरद पवारांना आला आहे. सर्व पक्षांची मोट बांधू शकणारा नेता ही त्यांची ओळख आहे. त्यामुळे कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्यास लोकसभेत असावं अशी त्यांची खेळी असू शकते. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू हे राष्ट्रीय राजकारणात भूमिका वठविण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे आपण मागे असू नये अशीही पवारांची इच्छा असू शकतो. पवार निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्याचा फायदा राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मिळेल का हे सध्याच सांगता येणार नाही. कारण त्याचं गणित हे भाजप-शिवसेनेची युती होती किंवा नाही यावर अवलंबून आहे.'' शरद पवाराचं नाव कायम पंतप्रधानपदासाठी घेतलं जातं. या पदासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्षमता पवारांकडे आहेत. मात्र ती संधी त्यांना कधीच मिळाली नाही. या आधी इंद्रकुमार गुजराल, एच.डी. देवेगौडा, चंद्रशेखर यांना अनपेक्षीतपणे संधी मिळाली होती. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही हे पवार कितीही सांगत असले तरी राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही याचं अचूक भान पवारांना आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा निवडणूक लढण्याचा पर्याय त्यांनी खुला ठेवल्याचं बोललं जातंय.
First published:

Tags: Election2019, Loksabha election 2019, Sharad pawar, माढा, लोकसभा निवडणूक2019, शरद पवार

पुढील बातम्या