नवी दिल्ली, 23 मार्च : लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी विरोधकांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे. यावेळी EVM विरोधात अगदी न्यायालयात जाण्यापर्यंत विचार विरोधक करत आहे.
शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक
दिग्विजय सिंगः ईव्हीएम संदर्भात काही आक्षेप आहेत. देशवासियांच्यामनात शंका आहे. यात गडबडी करता येई शकते. अनेक प्रश्न आहेत ज्याचे उत्तर निवडणूक आयोगानं द्यायला पाहीजे. आमच्या मनातील संभ्रम दूर व्हायला पाहीजे
कपिल सिब्बलः जेंव्हा जेंव्हा मशीन खराब होते, तेंव्हा मतदान भाजपच्या बाजूने जाते. आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. आम्ही अनेक वर्षा पासून आम्ही हे मुद्दे मांडतोय. आम्ही त्यांना विचारणार की तुम्ही हा मुद्दा तडीस न्यायला पाहीजे. जर आयोग योग्य उत्तर देत नाही तर आम्ही राजकीय पक्ष ठरवणार की पुढे काय करायचं?
जगातील कोणतेही मशीन मध्ये मॅन्युपुलेट करता येते. अमेरिका, जर्मनी या देशात मशीनचा वापर होत नाही. मग आपल्या देशात का वापर होतोय. वन मॅन वन वोट असायला पाहीजे.
कपिल सिब्बल : पराभव होत असतो पण चुकीच्या पद्धतीनं पराभव करणं हे योग्य नाही.
वाचा - 'मनसे इम्पॅक्ट', सेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने उद्धव ठाकरेंना डिवचलं, Video
समविचारी पक्षांचे एकमत
ईव्हीएमबाबत समविचारी पक्षांशी करार केला जाईल, असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतरही आयोगाने या विषयावर उत्तर न दिल्यास ते न्यायालयात धाव घेणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, चिप असलेली कोणतीही मशीन हॅक केली जाऊ शकते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान, शरद पवार यांनी गुरुवारी समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांना समान हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि EVM शंका आणि इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे.
पवारांनी लिहिले पत्र
स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या हितासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) अचूक असण्याची गरज असून त्याच्या कथित गैरवापराबाबत कोणतीही शंका मुख्य निवडणूक आयुक्तांनी दूर केली पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. विरोधी नेत्यांना लिहिलेल्या पत्रात पवार म्हणाले की, तज्ञांनी म्हटले आहे की चिप असलेली कोणतीही मशीन हॅक केली जाऊ शकते आणि "आम्ही लोकशाहीला अनैतिक घटकांकडून ओलिस ठेवू देऊ शकत नाही". यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या हितासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन तज्ज्ञांचे विचार ऐकायला हवेत, असं पत्रात लिहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sharad Pawar