नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तीन आठवड्यांचा कालावधी उलटला तरी राज्यात सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. एकत्र निवडणूक लढवणाऱ्या भाजप-सेनेमध्ये निकालानंतर मात्र मुख्यमंत्रिपदावरून मतभेद निर्माण झआले. त्यानंतर शिवसेनेसोबत सरकार स्थापण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार हालचाली सुरु आहेत. यावर रविवारी अंतिम निर्णय होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापनेचा निर्णय होईल. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी म्हटलं की, फक्त काँग्रेस काही ठरवू शकत नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर पुढची वाटचाल ठरेल.
Mallikarjun Kharge: Congress alone can't decide things. NCP chief Sharad Pawar and AICC president Sonia Gandhi will sit together on 17 Nov & discuss the next course of action. They will decide how to solve this problem. After that only the other actions will follow. #Maharashtra pic.twitter.com/sJ5bPSL2Ns
— ANI (@ANI) November 15, 2019
दरम्यान, गुरुवारी राज्यातील तीन पक्षाची एकत्र बैठक झाली. यामध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. त्यानंतर आता तीन पक्षातील वरिष्ठ नेते एकत्र मिळून चर्चा करतील. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत असं म्हटलं होतं. तसेच महाशिवआघाडीचं सरकार येईल आणि ते 5 वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल असं ही मह्टलं होतं.
मंत्रिपदाबाबत शिवसेनेनं 16- 14- 12 च्या फॉर्म्युला मांडला आहे. तर तीनही पक्षांना समान म्हणजेच 14-14-14 अशा फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं समजत आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षांसाठी असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे या दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याच मुख्यमंत्रिपदावरून आता महाशिवआघाडीतही मतभेद सुरू आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. मात्र पूर्ण पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री हवा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीत पेच निर्माण झाला आहे.
जेव्हा स्मृती इराणी तलवारबाजी करता, पाहा हा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा