रिया विरुद्ध FIR दाखल केल्यानंतर NCBचे गोव्यात छापे, ड्रग्ज तस्कर टार्गेटवर

रिया विरुद्ध FIR दाखल केल्यानंतर NCBचे गोव्यात छापे, ड्रग्ज तस्कर टार्गेटवर

ड्रग्ज तस्कर गौरव आर्य आणि रियामध्ये झालेल्या संभाषणाची माहिती बाहेर आल्यानंतर NCBने कारवाईला सुरुवात केली आहे.

  • Share this:

मुंबई 26 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आता नवीन माहिती समोर येत आहे. बुधवारीच सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती विरोधात अंमली पदार्थाच्या वापरा प्रकरणी FIR दाखल झाला होता. Narcotics Control Bureau म्हणजे NCBने रिया विरुद्ध FIR दाखल केला होता. त्यानंतर NCBने गोव्यात आपलं लक्ष केंद्रीत केलं असून ड्रग्ज पुरवढा करणाऱ्या तस्कराचा शोध घेतला जात आहे. ड्रग्ज तस्कर गौरव आर्य हा अभिनेत्यांना अंमली पदार्थ पुरवत होता अशी माहिती पुढे आली असून त्याचा शोध घेण्यासाठीच हे छापे असल्याचं सांगितलं जात आहे. NCBला गौरवचा सुगावा लागला असून लवकरच त्याता ताब्यात घेतलं जाऊ शकतं अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

NCBने रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)  यांना ड्रग्जचा पुरवढा केला जात होता याचे पुरावे ईडी ला मिळाल्याचा दावा NCBचे संचालक राकेश अस्थाना यांनी केला होता. त्यानंतर रिया विरुद्ध  कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईडीने NCBला पाठविलेल्या पत्रात ड्रग्ज संदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही  अस्थाना यांनी दिली आहे. यामुळे आता NCBही त्या अँगलने तपास करणार आहे.

Bullywood मधील कचराही साफ होईल; रियाच्या ड्रग्ज कनेक्शनवर कंगनाचं खळबळजनक विधान

यासंदर्भातले रियाचे काही Whatsapp चॅटही प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर झालं आहे.

पहिले चॅट

हे चॅट रिया आणि गौरव आर्यामधील आहे. गौरव तोच इसम आहे, जो ड्रग डीलर असल्याचे म्हटले जात आहे. या चॅटमध्ये असे म्हटले आहे की, 'जर आपण हार्ड ड्रग्जबाबत बोललो तर मी जास्त ड्रग्जचा वापर केला नाही आहे'. हा मेसेज रियाने 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठवला होता.

दुसरे चॅट

दुसऱ्या चॅटमध्ये रियाने गौरवशी बातचीत केली आहे. यामध्ये रियाने गौरवला विचारले आहे की, ' तुझ्याकडे MD आहे का?'. एमडीचा अर्थ MDMA असा होतो जे खूप स्ट्राँग ड्रग आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 26, 2020, 10:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading