छत्तीसगड 09 एप्रिल : छत्तीसगडमध्ये बीजापूर-सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर 3 एप्रिलला नक्षलवाद्यांनी हल्ला (Sukma-Bijapur Naxal Attack) केला. या हल्ल्यात 22 जवानांना वीरमरण आलं. तर,कोबरा बटालियनचे जवान राकेश्वर सिंह मन्हास (COBRA commando Rameshwar Singh) यांना नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवले होते. तब्बल 5 दिवसांनी नक्षलवाद्यांनी या जवानाची सुटका केली आहे. राकेश्वर सिंह यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारने दोन सदस्यांना नक्षलवाद्यांशी चर्चा करण्यासाठी नेमल्यानंतर या जवानाची सुटका केली गेली. राज्य सरकारनं नेमलेल्या दोघांपैकी एक सदस्य आदिवासी समाजाचे होते.
बीजापूरमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर राकेश सिंह मन्हास यांना नक्षल्यांनी 5 दिवस ओलीस ठेवले होते. नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर राकेश्वर सिंह यांनी न्यूज 18 ला सांगितलं की, 'ते' 5 दिवस त्यांनी कसे काढले..
राकेश्वरसिंह यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरं -
प्रश्न १- या पाच दिवसांत नक्षलवादी तुमच्याशी कसे वागले?
उत्तरः नक्षलवाद्यांनी जेवायला दिलं. त्यांनी म्हटलं होतं, की आम्ही तुम्हाला सोडून देऊ आणि त्याप्रमाणे आज त्यांनी सोडलं.
प्रश्न2 -तुम्ही नक्षलवाद्यांच्या तावडीत कसे सापडलात?
उत्तरः 3 तारखेला हल्ला झाला. त्यानंतर 4 तारखेला जंगलात भटकत असताना मी त्यांच्या तावडीत सापडलो.
प्रश्न -3 - तुम्ही नक्षवाद्यांना सापडलात तेव्हा बेशुद्ध होतात का?
उत्तर: नाही, त्यावेळी मी बेशुद्ध नव्हतो. 3तारखेला चकमकीनंतर मी बेशुद्ध होतो. 4 तारखेला या लोकांनी मला ताब्यात घेतलं होतं.
प्रश्न4 -तुम्हाला नक्षलवाद्यांनी किती गावांमध्ये आणि कुठल्या परिसरात फिरवलं?
उत्तर: मला माहिती नाही. त्यांनी माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती.
प्रश्न -5 - तुमचे हातदेखील बांधलेले होते का?
उत्तर – हो.
प्रश्न –6-तुम्हाला वेळेवर जेवण दिलं जात होतं का?
उत्तर - हो, ते वेळेवर जेवण देत होते.
प्रश्न -7 - नक्षली संघटनांनी तुमचा छळ केला का?
उत्तर - नाही. अजिबात नाही.
प्रश्न -8- नक्षलवाद्यांनी नोकरी सोडण्याची कोणती अट ठेवली होती का?
उत्तर - नाही. असं काहीच म्हटलं नाही.
प्रश्न -9 - नक्षलवाद्यांनी कोणती अट ठेवली होती का?
उत्तर - नाही.
प्रश्न -10 -नक्षवाद्यांनी काय चौकशी केली. तसेच पोलिसांबाबत काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला का?
उत्तर - त्यांनी कोणतीच माहिती मागितली नाही.
प्रश्न -11 - नक्षलवाद्यांनी ज्या दिवशी तुम्हाला पकडलं त्या दिवशीच तुम्हाला सोडणार असल्याचं सांगितलं होतं का?
उत्तर - हो,त्यांनी मला सोडणार असल्याचं सागितलं होतं.
प्रश्न -12 - नक्षलवाद्यांच्या ताब्यात असताना तुमची हत्या होऊ शकते, असं तुम्हाला वाटलं होतं का?
उत्तर - हो. मला वाटलं होतं की माझी हत्या होऊ शकते.
राकेश्वर सिंह मन्हास यांच्या सुटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद साजरा केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Naxal Attack