दंतेवाडा, 6 नोव्हेंबर : छत्तीगडमधील दंतेवाडा येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (encounter between Police and Naxalist in Danttewada Chhattisgarh) झाली. शुक्रवारी झालेल्या या चकमकीत नक्षलवादी कमांडर ठार (Top Naxalist commander killed) झाला आहे. ठार झालेल्या या नक्षलवादी कमांडरवर 5 लाखांचे बक्षीस पोलिसांकडून ठेवण्यात आले होते. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात ठार झालेल्या या नक्षलवादी कमांडरचे नाव रामसू असल्याची माहिती समोर आली आहे.
या चकमकीनंतर पोलिसांनी सांगितले की, ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख पटली आहे. त्याचे नाव रामसू असे आहे. तो प्लाटून नंबर 16 च्या सेक्शनचा कमांडर होता. इंदिरावती एरिया कमेटीच्या नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तो ठार झाला आहे.
मोठा शस्त्रसाठा जप्त
या चकमकीनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध मोहिम राबवली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला. ज्यामध्ये पिस्तूल, 5 किलो बॉम्ब, वायर आणि इतर साहित्यांचा समावेश आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिषेक पल्लव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Chhattisgarh: A joint team of Sukma Police & CRPF arrested 8 Naxals including two who were carrying a reward of Rs 8 lakhs & Rs 5 lakhs on their heads, from Morpalli area
"IEDs, explosives & objectionable literature were recovered from their possession," police said yesterday pic.twitter.com/GCBYRD0if0 — ANI (@ANI) November 5, 2021
वाचा : एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात, धुक्यामुळे आदळल्या एकमेकांना; 12 जण जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रावती नदीच्या पलीकडे नक्षलवाद्यांचा मोठा वावर असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. या परिसरात अनेक कुख्यात नक्षलवादी उपस्थित असल्याचीही माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी पोलिसांच्या टीमने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केला. त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं.
नक्षलवाद्यांचा गोळीबार सुरू असताना पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. यासोबतच नक्षलवाद्यांना पोलिसांनी घेरले. दोन्ही बाजुंनी बराचवेळ गोळीबार सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात जवळपास अर्धातास गोळीबार सुरू होता. या चकमकीत एका नक्षलवादी कमांडरचा खात्मा झाला आहे. या चकमकीनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना तेथे पिस्तूल, आयईडीसह इतर शस्त्रसाठा आढळून आला.
पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबरला दिवाळीपूर्वी नक्षलवाद्यांच्या सुरू असलेल्या कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान निघाले होते. त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांना आयईडी ठेवत असताना पाहिले. त्यांनंतर सुरक्षा दलाने या सर्व परिसराला घेरलं आणि नक्षलवाद्यांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून आयईडी, स्फोटके आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.
एप्रिल महिन्यात मोठा नक्षलवादी हल्ला
छत्तीसगडमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवाती झालेल्या चकमकीत अनेक जवानांना वीरमरण आलं होतं. सुरुवातीला 5 नंतर 20 आणि त्यानंतर 22 जवानांना या चकमकीत वीरमरण आल्याचं समोर आलं. याबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली. या घटनेमध्ये 200 नक्षलवादी सहभागी असल्याचं सुरुवातीला समोर आलं होतं. मात्र, त्यानंतर या घटनेत 200 नव्हे तर 700 नक्षलवादी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhattisgarh, Naxal Attack, Police