मराठी बातम्या /बातम्या /देश /

Bihar Naxal Attack : नक्षलवाद्यांच्या क्रूरपणाचा कहर, चौघांना फासावर लटकवलं, नंतर घरच बॉम्बने उडवलं

Bihar Naxal Attack : नक्षलवाद्यांच्या क्रूरपणाचा कहर, चौघांना फासावर लटकवलं, नंतर घरच बॉम्बने उडवलं

नक्षलवाद्यांचा बिहारच्या गया जिल्ह्यात हैदोस

नक्षलवाद्यांचा बिहारच्या गया जिल्ह्यात हैदोस

Bihar Naxal attack : नक्षलवाद्यांनी सरजू सिंह भोक्ता यांच्या कुटुंबावर इतका भीषण हल्ला का केला? असा प्रश्न अनेकांना सतावतोय. दुसरीकडे नक्षलवाद्यांनी चौघांची हत्या केल्यानंतर घराबाहेर एक लिफाफा ठेवला होता.

  • Published by:  Chetan Patil

पाटणा, 14 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या (Maharashtra) गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान (Naxal Killed) घातल्याची बातमी ताजी असताना बिहारमधून (Bihar) एक मन हेलावणारी घटना समोर आलीय. बिहारच्या गया जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी  प्रचंड हैदोस घातला (Gaya Naxal attack). या नक्षलवाद्यांनी चार जणांची निर्घृणपणे हत्या केली. नक्षलवादी एवढ्यावरच थांबले नाहीत तर चौघांच्या हत्येनंतर त्यांच्या घराला बॉम्बने (Bomb Attack) उडवलं. त्यांच्या या क्रूर कारस्थानामुळे संपूर्ण बिहार राज्य हादरलं आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही गया जिल्ह्यातील डुमरीया येथील मोनबारा गावात शनिवारी (13 नोव्हेंबर) रात्री घडली. गावात वास्तव्यास असलेले सरजू सिंह भोक्ता यांचं घर नक्षलवाद्यांनी बॉम्बने उडवलं आहे. त्याआधी नक्षलवाद्यांनी सरजू यांचे दोन्ही मुलं, पत्नी आणि घरातील आणखी एका महिलेला गळफास देऊन घराबाहेर लटकवलं. नक्षलवाद्यांच्या या भयानक कृत्याने संपूर्ण गाव हादरलं आहे.

हेही वाचा : पुणे ग्रामीण भागात जमावबंदी लागू, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

नक्षलवाद्यांनी इतकं क्रूर कृत्य का केलं?

नक्षलवाद्यांनी सरजू सिंह भोक्ता यांच्या कुटुंबावर इतका भीषण हल्ला का केला? असा प्रश्न अनेकांना सतावतोय. दुसरीकडे नक्षलवाद्यांनी चौघांची हत्या केल्यानंतर घराबाहेर एक लिफाफा ठेवला होता. त्यात त्यांनी हत्येचं कारण सांगितलंय. त्यात त्यांनी संबंधित कुटुंबाने विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यांनी लिफाफ्यात आपल्या चार साथीदारांचं नाव लिहिलं आहे. अमरेश कुमार, सीता कुमार, शिवपूजन कुमार आणि उदय कुमार यांच्या हत्येचा बदला घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसंच आपला विश्वासघात करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशारा नक्षलवाद्यांनी दिला.

हेही वाचा : एका रात्रीचे 25 हजार; टूरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तरुणींचा भांडाफोड

नक्षलवाद्यांचा नेमका दावा काय?

संबंधित कुटुंबाने पोलिसांना अमरेश कुमार, सीता कुमार, शिवपूजन कुमार आणि उदय कुमार यांची माहिती दिली होती. त्यातून त्यांची हत्या झाली. पोलिसांनी केलेल्या ऑपरेशनमधून त्यांना संपविण्यात आलेलं नाही. या हत्या विश्वासघातातून करण्यात आल्यात. त्यातूनच हा बदला घेण्यात आल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे.

हेही वाचा : वृद्धेनं कोट्यवधीची संपत्ती केली रिक्षाचालकाच्या नावावर, कारण वाचून पाणवतील डोळे

पोलिसांकडून सर्च ऑपरेशन जारी

दरम्यान, संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्यामुळे हैदोस घालणारे नक्षलवादी पोलिसांच्या जाळ्यात सापडले तर त्यांचा नक्कीच खात्मा होईल, अशी आशा व्यक्त केली जातेय. याशिवाय या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशत माजली आहे. पोलीस गावकऱ्यांचं समुपदेशनही करत आहेत.

First published: