जगप्रवासाला निघाल्या नौदलाच्या रणरागिणी

जगप्रवासाला निघाल्या नौदलाच्या रणरागिणी

लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी , प्रतिभा जामवाल, स्वाती पी , विजया देवी, पायल गुप्ता , ऐश्वर्या बोड्डापती यांना खास प्रशिक्षित केलंय. नाविका सागरी परिक्रमा या नावाने ओळखली जाणारी ही मोहीम गोव्याच्या समुद्रातून सुरू झाली.

  • Share this:

दिनेश केळुसकर, गोवा, 10 सप्टेंबर : नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय नौदलाच्या सहा जिगरबाज महिला शिडाच्या बोटीतून जगप्रवासाला निघाल्यात. भारतीय नौदलाची ही खास शिडाची बोट आहे आय एन एस व्ही तारिणी . आणि या बोटीवर स्वार आहेत नौदलातल्या सहा जिगरबाज महिला ज्या जगप्रवासाला निघाल्यायत.

लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी , प्रतिभा जामवाल, स्वाती पी , विजया देवी, पायल गुप्ता , ऐश्वर्या बोड्डापती यांना खास प्रशिक्षित केलंय. नाविका सागरी परिक्रमा या नावाने ओळखली जाणारी ही मोहीम गोव्याच्या समुद्रातून सुरू झाली.  संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला.

अत्यंत आव्हानात्मक मोहिमेचं नेतृत्व लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी करतायत. गोव्यापासून सुरू झालेली ही मोहीम 165 दिवसांची असेल. सुमारे 21 हजार 600 सागरी  मैलांच्या या प्रवासात या महिला ऑस्टेलिया , न्यूझीलंड , फॉकलंड आणि दक्षिण आफ्रीका या चार देशातल्या बंदरात  दुरुस्ती आणि रेशन पाण्यासाठी थांबतील.

केवळ महिला संघाने समुद्रमार्गे जगाच्या परिक्रमेला निघण्याची संपूर्ण आशियातली ही पहिलीच घटना असून नौदलातल्या महिलांनी स्वीकारलेल्या या आव्हानामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2017 08:29 PM IST

ताज्या बातम्या