S M L

चीनच्या संशयास्पद हालचालींमुळे भारतीय नौदलानं गस्त वाढवली

भारतानं एकूण 8 युद्धनौका भारतीय महासागराच्या एंट्रीपॉईंट्सवर तैनात केल्या आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Feb 21, 2018 11:42 AM IST

चीनच्या संशयास्पद हालचालींमुळे भारतीय नौदलानं गस्त वाढवली

21 फेब्रुवारी : भारतीय महासागरात चीनच्या संशयास्पद हालचालींमुळे भारतीय नौदलानं गस्त वाढवलीये. भारतानं एकूण 8 युद्धनौका भारतीय महासागराच्या एंट्रीपॉईंट्सवर तैनात केल्या आहेत. मालदिवला भारतानं लष्करी मदत करू नये, म्हणून चीनच्या युद्धनौका भारतीय महासागरात दाखल होतायेत, अशी अफवा काही दिवसांपूर्वी उठली होती.

साहजिकच भारतीय नौदलानं त्याचं खंडन केलंय. युद्धनौकांबरोबरच अत्याधुनिक रुकमिणी रडार प्रणालीही चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

पाहूयात यामागचं नेमकं कारण काय आहे ?

- 5 फेब्रुवारी 2018 - मालदिवमध्ये आणीबाणी जाहीर

- भारतानं मदत करावी, मालदिवमधल्या विरोधकांची विनंती

Loading...

- भारत बारीक लक्ष ठेवून, भारताची सूचक प्रतिक्रिया

- भारतानं हस्तक्षेप करू नये, चीनचा इशारा

- भारतीय महासागराजवळ चीनच्या संशयास्पद हालचाली

- चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारताच्या 8 युद्धनौका तैनात

- याआधी 1998मध्ये मालदीवला भारताकडून लष्करी मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2018 11:42 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close