चीनचं जहाज भारतात घुसलं, नौदलाने दिला दणका

चीनचं जहाज भारतात घुसलं, नौदलाने दिला दणका

काही अतिरेकी गट हे भारतात घुसण्याच्या तयारीत असून भारताकडे त्याची माहिती आहे. नौदलाचं आधुनिकीकरण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यात येत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 03 डिसेंबर : भारताच्या सागरी हद्दीचं सरंक्षण करणं हे एक मोठं आव्हान आहे. अशा सगळ्या आव्हानाला पेलण्याची क्षमता नौदलाची आहे असं मत नौदल प्रमुख अ‍ॅडमीरल करमबीर सिंह यांनी व्यक्त केलंय. 4 डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक मोठा खुलासा केलाय. भारताच्या सागरी हद्दीत चीनचं एक जहाज घुसलं होतं भारतीय नौदलाने दणका देत त्यांनी ते हुसकून लावलं अशी माहितीही त्यांनी दिली. कुठल्याही देशाची मनमानी भारत सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 2008 नंतर चीनने हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर भारताची नजर आहे असंही ते म्हणाले.नौदल प्रमुखांनी सांगितलं की, 'शी यान 1' हे चीनचं जहाज भारताच्या हद्दीत घुसलं होतं.

देवेंद्र फडणवीसांनी केला पंकजा मुंडे यांना फोन, म्हणाले...

कुठलीही परवानगी न घेता हे जहाज भारतीय हद्दीत आल्याचं नौदला आढळून आलं होतं. त्यानंतर नौदलाने त्वरीत कारवाई करत त्यांना पिटाळून लावलं अशी माहितीही त्यांनी दिलीय. हिंदी महासागरात पाकिस्तानच्या मनसुब्यांची भारताला कल्पना असून त्यासाठी नौदल कायम दक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काही अतिरेकी गट हे भारतात घुसण्याच्या तयारीत असून भारताकडे त्याची माहिती आहे. नौदलाचं आधुनिकीकरण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यात येत आहेत. नौदलाकडे तीन विमानवाहू नौका असाव्यात यासाठी भारताने दीर्घकालीन योजना आखलीय.  2022 पर्यंत नौदलाकडे पहिलं स्वदेशी विमानवाहू नौका येईल असंही नौदल प्रमुखांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, बुलेट ट्रेनबाबत होणार फेरविचार

गुजरात आणि मुंबई हे पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ आहेत.  मुंबई वरच्या हल्ल्याच्या वेळी कसाब आणि इतर दहशतवादी हे कराचीच्या सागरी किनाऱ्यावरूनच गेट वे ऑफ इंडियावर आले होते. त्यामुळे सागरी सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.

 

First published: December 3, 2019, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading