Elec-widget

Navratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून दिल्या नवरात्राच्या शुभेच्छा

  • Share this:

शारदीय नवरात्राला आजपासून सुरुवात झाली आहे. आदिशक्तीचा जागर, देवीच्या दर्शनासाठी अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

नवरात्रात व्रत वैकल्य केल्यांना आपल्याकडे फार महत्त्व आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही जवळपास 40 वर्षांपासून नवरात्रीचं व्रत पाळत आहेत. त्याच्या आयुष्यात नवरात्राला विशेष महत्त्व आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी ट्विटरवरून देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मोदी खूप संयमी आणि कडक व्रत पाळतात. अनेक दौरे, बैठका आणि कार्यक्रम असा व्यस्त दिनक्रम असला तरीही आजपर्यंत त्याचं व्रत त्यांनी कधीही मोडलं नाही.

ते कोणतीही फळं, जेवण काही आहार घेत नाहीत. या 9 दिवसांमध्ये फक्त कोमट पाणी घेतात. त्यांनी कधीही सुट्टी घेतली नाही. आपलं व्यस्त रुटीन सांभाळून व्रत मनोभावे पूर्ण केलं. त्यांच्या व्रताबाबत ते जास्त कुठेही बोलत नाहीत.

त्यांच्या म्हणण्यानुसार आत्म्याचं शुद्धिकरण करण्यासाठी आणि मनशांतीसाठी ते हे व्रत करतात असं त्यांनीचं 2012 साली ब्लॉगमध्ये लिहिलं होतं.

Loading...

सप्टेंबर 2014 रोजी नवरात्रात पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांचा उपवास असल्यानं त्यांनी बराक ओबामांनी त्यांच्यासाठी ठेवलेल्या शाही जेवणाचा आस्वाद घेतला नाही. मोदींनी माझा उपवास आहे असं सांगत लिंबू पाणी प्यायले.

मोदींच्या नवरात्राच्या व्रतामागे रंजक कथा आहे. अहमदाबादला असताना रा. स्व. संघात मोदी होते. त्यावेळी लक्ष्मणराव इनामदार यांचा सहवास त्यांना लाभला. इमानदार यांना उपवास करण्याची सवय होती. त्यांच्या व्रतापासून प्रेरणा घेऊन मोदींनी शारदीय आणि चैत्र नवरात्रीचा उपवास करण्याचं व्रत घेतलं.

नवरात्रामध्ये अन्न, गोड खाणं आणि फळं सोडून फक्त उकळलेलं पाणी किंवा लिंबू सरबत घेतात आणि हे व्रत दोन्ही नवरात्रात 9 दिवस न चुकता पाळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2019 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...