Navratri 2019 : मिशन चंद्रयान-2, कलम 370च्या टॅटूची तुफान चर्चा; काय आहे ट्रेन्ड

नवरात्रात टॅटूची धूम... महिलांनी बनवले चंद्रयान आणि कलम 370 चे टॅटू

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 01:56 PM IST

Navratri 2019 : मिशन चंद्रयान-2, कलम 370च्या टॅटूची तुफान चर्चा; काय आहे ट्रेन्ड

सूरत, 29 सप्टेंबर: नवरात्र लेटेस्ट टैटू डिजाइन (Happy Navratri 2019, Navratri latest tattoo)नवरात्रामध्ये देवीच्या 9 रुपांची 9 दिवस पूजा केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये महिला आणि मुलींची तुलना देवीसोबत केली जाते. भारतात काही भागांमध्ये नवरात्रात देवीचं रुप म्हणून मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. कदाचित यामुळेच महिलांमध्ये नवरात्रात साज श्रृंगार करण्याचा उत्साह असतो. महिला या दिवसांमध्ये 9 रंगाचे विविध साजश्रृंगार करतात. गरबा आणि दांडिया सारखे खेळ खेळून रात्र जागवण्याची प्रथा आहे. बदलत्या ट्रेन्ड नुसार महिला गरबा आणि दांडिया खेळण्याआधी टॅटू काढतात. तर काही महिला हौस म्हणून वेगवळे टॅटू काढतात. मात्र यंदा महिलांनी अनोखे टॅटू काढल्यानं चर्चेचा विषय बनला आहे. या वर्षीच्या नवरात्रामध्ये सध्या सुरू असणाऱ्या ज्वलंत विषयावर महिलांनी हातावर, पाठिवर टॅटू काढले आहेत. असे कोणते स्पेशल टॅटू आहेत जे या नवरात्रात स्पेशल ट्रेन्डिंग आणि लक्षवेधून घेणारे आहेत पाहा आणि अशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही करू शकता.

नवरात्रात महिलांनी पाठीवर आणि दंडावर इस्रोच्या समर्थनार्थ आणि कामगिरी दाखवणं ह्या हेतूने चंद्रयान-2चा टॅटू काढला आहे. मिशन चंद्रयान 2 अद्याप यशस्वी झालं नसलं तरीही भारतीयांनी आशा सोडली नाही. प्रत्येक भारतीय इस्रोच्या पाठीशी आहे आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. हे सांगण्यासाठी खास महिलांनी मिशन चंद्रयान 2 च्या समर्थनार्थ टॅटू काढले आहेत.

त्यासोबतच सध्या सुरू असलेला ज्वलंत विषय म्हणजे कलम 370, वाहतुकीच्या नियमातील बदल यांचं समर्थन करण्यासाठी महिलांनी टॅटू काढले आहेत. ह्यामध्ये ट्रॅफिक लाईट्स, हेलमेट, ट्रॅफिक पोलीस, नियमांचं पालन करणारे स्लोगन अशा पद्धतीनं महिलांनी वेगवेगळे टॅटू काढले आहेत. महिलांनी काढलेला टॅटू चर्चेचा विषय ठरला आहे.

खेळता खेळता चिमुकला व्हॅनखाली चिरडला; अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: navratri
First Published: Sep 29, 2019 01:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...