मृत व्यक्तीची ओळख त्याच्याजवळ असलेल्या बाईकच्या कागदपत्रावरुन झाली. दोन दिवसांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. पतीच्या मृत्यूनंतर नववधुवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे.
शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. बेहटा भवानी गावातील निवासी अशोक कुमार पांडे यांचा एकुलता एक मुलगा सत्यम याचं लग्न 2 डिसेंबर रोजी गौरी गावात झाली होती. शुक्रवारी रात्री सत्यम बाईक घेऊन घरातून एका महत्त्वाच्या कामासाठी निघाले होते. रायबरेली हायवे वर बिघापूर पोलीस ठाणे हद्दीत अकवा गावाजवळ लोकांनी एक तरुण रक्ताळलेल्या अवस्थेत तडफडत असल्याचे पाहिले. लोकांनी पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केलं.
येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी बाइकच्या कागदपत्रांवरुन मृत व्यक्तीची ओळख पटवली. पोलिसांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सत्यमच्या मृत्यूनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे सांगितले. पोलिसांनी सत्यमचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.