Home /News /national /

पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नवनीत राणा यांनी रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्या बोलत होत्या.

    नवी दिल्ली, 15 मे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी काल मुंबईत (Mumbai) बीकेसी (BKC) मैदानावर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यातच अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या भाषणावर टीका केली आहे. शिवसेनेची काल मुंबईत झालेली सभा म्हणजे लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती, अशी घणाघाती टीका नवनीत राणांनी (Navneet Rana) केलीय. नवनीत राणा यांनी रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्या बोलत होत्या. आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि लोडशेडिंग यावर चकार शब्दही उच्चारला नाही. फक्त इतरांवर टीका करण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती, असे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे
    • मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एक व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा.
    • देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढलीये. औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलला नाही. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायचं तुम्हीच म्हणाला होता. पण व्यासपीठावर बोलताना त्याची काही गरज नाही म्हणालात. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत. त्यांना माहित आहे की नाव बदललं तर बाकीचे पक्ष बाजूला होतील.
    • काल एका खासदाराने मुख्यमंत्र्यांच्या हातात गदा देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी त्याला हात न लावता ते मागे फिरले. गदा कोणी दिली तर त्याला हातात घेऊन त्यानंतर गदा दुसऱ्याकडे दिली जाते. पण मुख्यमंत्र्यांनी गदा हातात न घेऊन हनुमानाचा अपमान केलाय.
    • मला म्हणाले हनुमान चालिसा काश्मीरमध्ये जाऊन म्हणा. जर मी काश्मिरमध्ये हनुमान चालिसा पठण करू शकते तर महाराष्ट्रात का नाही? मी नवनीत राणा, रवी राणाच्या फायद्यासाठी हनुमान चालिसा म्हणणार नव्हते.
    • तुम्ही पुरुष आहात, माझ्यापेक्षा महिलेपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत. पण तुम्ही तुमच्या शक्तीचा गैरवापर केलात. हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी करणाऱ्या महिलेला तुम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकता. पण औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का?
    • बाळासाहेब असते तर ज्याने औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, त्याला त्याच कबरीमध्ये गाडलं असतं, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण आजचे मुख्यमंत्री लाचार आहेत. त्या सभेत कोणाला उत्साह नव्हता.
    • आपण औरंगाबादचे नाव बदलायला गेलो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपली साथ सोडतील आणि आपली सत्ता जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून दाखवले. पण उद्धव ठाकरे यांना साधं एका शहराचं नावही बदलता येत नाही.
    • सभा मुंबई महापालिकेसाठी होती आणि सगळ्या राज्यातून लोक तिथं आले होते. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढायला हवी, याचं उत्तर त्यांनी का दिलं नाही? बाळासाहेब कधी लढले नाहीत, सत्तेवर बसले नाही, कायम शिवसेनेला वाढवत राहिले. इतिहासात पाहा, हनुमान चालिसा तोच वाचतो, ज्याला कोणालातरी संकटातून मुक्त करायचं असतं. आणि तुम्ही म्हणता, का हनुमान चालिसा म्हणायची? ही तुमची नवी विचारधारा आहे.
    • मुन्नाभाई चित्रपट आला होता. कोणाबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांना बाळासाहेब दिसतात. मुन्नाभाई सुपरहिट पिक्चर होता, तसं हे हिट झाले तर तुम्ही सुपरफ्लॉप व्हाल. जे स्वप्न पाहतात, तेच ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवतात. तुम्हाला त्यांच्या शालीबद्दलही समस्या आहे.
    • सचिन वाझे हा मातोश्रीच्या आदेशाने वसुली करायचा. अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात असे कधी घडले नव्हते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Navneet Rana, Ravi rana, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या