चायवाला, पकौडेवाला आणि चौकीदार, सिद्धू यांच्या वक्तव्यावरून नवा वाद

चायवाला, पकौडेवाला आणि चौकीदार, सिद्धू यांच्या वक्तव्यावरून नवा वाद

काँग्रेसचे मंत्री आणि माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून धुरळा उडवून दिला आहे. सिद्धू यांनी मतदारांना मत देण्याचं आवाहन तर केलं पण त्यातही त्यांनी नरेंद्र मोदींना चायवाला, पकौडेवाला आणि चौकिदार अशा शब्दांवरून टोले मारले.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : काँग्रेसचे मंत्री आणि माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून धुरळा उडवून दिला आहे. सिद्धू यांनी मतदारांना मत देण्याचं आवाहन तर केलं पण त्यातही त्यांनी नरेंद्र मोदींना चायवाला, पकौडेवाला आणि चौकिदार अशा शब्दांवरून टोले मारले.

'एक चुकीचं मत तुमच्या मुलाला चहावाला, पकौडेवाला किंवा चौकीदार बनवू शकतं', असं ट्वीट नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलं आहे. मतदान करून पस्तावण्यापेक्षा तुम्ही आधीच तयारी करा आणि चुकीचा निर्णय घेण्यापासून स्वत:ला वाचवा, अशी टिप्पणी सिद्धू यांनी ट्विटरवर केली आहे.

सोनियांचा प्रचार

याआधी नवज्योतसिंग सिद्धू यांनी, रायबरेलीमध्ये यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांचा प्रचार केला आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. हत्तीला कुशीत घेणं आणि मोदींकडून सत्य बाहेर काढणं हे शक्य नाही, असंही सिद्धू म्हणाले होते.

'पुलवामा'नंतर वाद

पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टिकेची राळ उठली होती. पुलवामा हल्ल्याबदद्ल पाकिस्तानातल्या सगळ्याच लोकांना दोषी ठरवता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर सिद्धू यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी विरोधकांनी केली होती. या वक्तव्यामुळे सिद्धू यांना कपिल शर्मा शो मधूनही काढून टाकण्यात आलं होतं. हा वाद संपत नाही तोच सिद्धू यांनी आणखीही वादग्रस्त वक्तव्यं केली होती. आता त्यात या नव्या वाक्याची भर पडली आहे.

=================================================================================

VIDEO : राज ठाकरेंनी पावणे दोन तास रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

First published: April 29, 2019, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading