News18 Lokmat

सिद्धू यांच्या वक्तव्यावरून पुन्हा वाद, मुस्लीम मतदारांना केलं हे आवाहन

माजी क्रिकेटर आणि पंजाब सरकारमधले मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरुद्ध मतदान करा, असं आवाहन त्याने मुस्लिमांना केलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 03:37 PM IST

सिद्धू यांच्या वक्तव्यावरून पुन्हा वाद, मुस्लीम मतदारांना केलं हे आवाहन

पाटणा, 16 एप्रिल : माजी क्रिकेटर आणि पंजाब सरकारमधले मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरुद्ध मतदान करा, असं आवाहन त्याने मुस्लिमांना केलं.

नुकतंच मनेका गांधींनी मुस्लीम मतदारांबद्दल केलेलं वक्तव्य गाजलं होतं. त्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाईही केली. पण एवढं सगळं होऊनही नवज्योतसिंग सिद्धू यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही मतांचं विभाजन होऊ देऊ नका, असा इशारा मुस्लीम मतदारांना दिला होता. त्यांच्यावरही प्रचारबंदीची कारवाई झाली.

कटिहारमध्ये भाषण

नवज्योतसिंग सिद्धू यांनी बिहारमधल्या कटिहारमधल्या प्रचारात मुस्लीम समुदायासमोर भाषण करताना हे वक्तव्य केलं. तुम्ही अल्पसंख्य असूनही बहुसंख्य आहात. तुम्ही एकजूट दाखवली तर इथले उमेदवार तारिक अन्वर यांना कुणीही हरवू शकत नाही, असं ते म्हणाले.

Loading...

याआधी पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळेही सिद्धू यांच्यावर चांगलीच टीका झाली होती.आता पुन्हा त्यांनी हा वाद ओढवून घेतला आहे.

64 टक्के मुस्लीम

कटिहारमधल्या बलरामपूर विधानसभा क्षेत्रात बारसोईमध्ये सिद्धू यांनी हे भाषण केलं. तुमची संख्या इथे 64 टक्के आहे. इथले मुस्लीम लोक हे आमची पगडी आहेत. तुम्हाला काही त्रास झाला तरी मला सांगा. मी पंजाबमध्येही तुम्हाला मदत करेन, असं आश्वासन सिद्धू यांनी दिलं.

'मोदींना सीमापार घालवा'

भाजप आणि विरोधकांना लक्ष्य करत सिद्धू म्हणाले, हे लोक मतांची विभागणी करून जिंकू पाहतात पण तुम्ही सगळे एकत्र आलात तर मोदींचा पराभव होईल.

या निवडणुकीत षटकार मारा आणि मोदींना सीमेपार घालवा, असंही ते म्हणाले.

तारीक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून 19 वर्षांनी काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर ते कटिहारमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा हा मतदारसंघ पश्चिम बंगालला जोडलेला आहे. याच मतदारसंघातून ते पाच वेळा खासदार झाले आहेत. त्यांच्या काँग्रेसच्या उमेदवारीमुळे आणि प्रचारामुळे कटिहार मतदारसंघ चांगलाच गाजतो आहे.


====================================================================================================================================================================

VIDEO: रितेश देशमुखही प्रचाराच्या मैदानात; पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...