फक्त नवज्योतसिंग सिद्धूला माहिती होता राहुल गांधींचा 'सिक्रेट प्लॅन'?

फक्त नवज्योतसिंग सिद्धूला माहिती होता राहुल गांधींचा 'सिक्रेट प्लॅन'?

राहुल असा काही निर्णय घेतील याची कल्पना काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनाही नव्हती.

  • Share this:

नवी दिल्ली 23 जानेवारी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी खेळलेल्या राजकीय खेळीने बुधवारी सर्वांना धक्का बसला. प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. लोकसभा निवडणुकाला 4 महिने शिल्लक असतानाच त्यांनी प्रियांकाच्या राजकारण प्रवेशाची घोषणा करुन नवी खेळी खेळली.

राहुल असा काही निर्णय घेतील याची कल्पना काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनाही नव्हती. याला अपवाद म्हणजे नवज्योतसिंग सिद्धू आहे. कारण 3 जानेवारीला राहुल आणि प्रियांका यांची भेट घेतल्यानंतर सिद्धूने ट्विट करत मी काँग्रेसच्या बीग बॉसेसना भेटलो असं म्हटलं होतं.

प्रियांका गांधी यांच्या नियुक्तीनंतर आता सिद्धू यांच्या त्या ट्विटची चर्चा सुरू झालीय. सिद्धूने प्रियांकांनाही बिग बॉस असं म्हणणं हा योगायोग आहे की त्यांना माहित होतं अशी आता चर्चा सोशल मीडियावर सुरू झालीय.

काय होतं सिद्धूचं ट्विट

काँग्रेसचे पंजाबमधले मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आपल्या बोलण्याच्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. शेरोशायरी चा वापर करून बोलण्याचा त्यांचा खास असा अंदाज आहे. आपल्या ट्विटमधूनही ते अनेकदा त्याच ढंगात व्यक्त होतात. 3 जानेवारीला त्यांनी केलेल्या एका ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबतचा त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि या चर्चेला सुरुवात झाली.

सिद्धू यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची भेट घेतली आणि भेटीचं छायाचित्र ट्विट केलं, त्यावर लिहिलं होतं की, " तुम्हाला कुणी प्रोत्साहन दिलं तर ते उर्जेचं काम करतं. आयुष्यात पुढं जायला मदत करतं. आज मी आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर आहे आणि माझ्या बीग बॉसेसना, मार्गदर्शकांना भेटून मी भारावून गेलोय." पुढच्या एका ट्विटमध्ये ते लिहितात की "हा फोटो माझ्या ड्राईंगरुममध्ये आयुष्यभर लावण्यासारखा आहे."

या फोटोत प्रियांका गांधीही आहेत, सिद्धूने बिग बॉस आणि मार्गदर्शक असे शब्द वापरल्याने नेटकऱ्यांनी सिद्धूला टोमणे मारले. प्रियांका गांधी या काँग्रेसच्या बिग बॉस कधीपासून झाल्या असा सवाल त्यांनी सिद्धूला विचारलाय. प्रियांका या मार्गदर्शक असतीलही पण त्या बिग बॉस कशा? असाही प्रश्न त्यांनी सिद्धूला विचारलाय होता.

// ]]>

First published: January 23, 2019, 6:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading