स्मृती इराणी 2024 पर्यंत KG मध्ये तरी प्रवेश घेतील, सिद्धूंचा टोला

स्मृती इराणी 2024 पर्यंत KG मध्ये तरी प्रवेश घेतील, सिद्धूंचा टोला

स्मृती इराणी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात आपल्या शिक्षणाबाबत माहिती दिली होती.

  • Share this:

मुंबई, 03 मे : काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धु यांनी केंद्रीय मंत्री आणि अमेठीतून लढणाऱ्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आहे. सिद्धू यांनी टि्वट करून स्मृती इराणी यांच्या पदवीवरुन टोला लगावला आहे.

सिदधू यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे की, 2024 च्या निवडणुकीच्या आधी स्मृती इराणी केजीमध्ये प्रवेश घेतील. 'स्मृती इराणीजी 2014 मध्ये बीए पास होत्या, 2019 च्या निवडणुकीत त्या 12 वी पास झाल्या. आता मला असं वाटतं की, 2024 च्या निवडणुकीआधी त्या केजी (KG) मध्ये प्रवेश नक्की घेतील.'

स्मृती इराणी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर केले असता शपथपत्रात आपल्या शिक्षणाबाबत माहिती दिली होती. यात त्यांनी पदवी प्राप्त केली असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी 1996 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीएची डिग्री मिळवली आहे. परंतु, 2019 मध्ये त्यांनी आपल्या शपथपत्रात आपण 12 वी पास असल्याचं सांगितलं.

2019 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पदवी मिळवली नसल्याचं सांगितलं, त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर एकच टीकेची झोड उडवली. यावर त्यांनी खुलासा केला की, 'डिग्रीचा कोर्स सुरू केला होता, परंतु, तो पूर्ण करू शकले नाही.' दोन्ही निवडणुकीत शिक्षणाबाबत वेगवेगळी माहिती सादर केल्यामुळे विरोधकांनी यावर जोरदार आक्षेप घेतला होता. एवढंच नाहीतर स्मृती इराणी या केंद्रीय मंत्री झाल्या होत्या तेव्हाही त्यांच्या शिक्षणावर वाद झाला होता.

====================================

First published: May 3, 2019, 8:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading