पंजाब विधानसभेत सिद्धूंच्या विरोधात घोषणा, पुलवामा हल्ल्यावरील वक्तव्य भोवलं

पंजाब विधानसभेत सिद्धूंच्या विरोधात घोषणा, पुलवामा हल्ल्यावरील वक्तव्य भोवलं

पंजाब विधानसभेत अकाली दलाच्या आमदारांनी सिद्धूंच्या विरोधात घोषणा दिल्या.

  • Share this:

चंदीगड, 18 फेब्रुवारी: पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर माजी क्रिकेटर आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी 'दहशतवादाला धर्म आणि देश नसतो' अशी प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणावर प्रथम सोनी टीव्हीने त्यांना कपिल शर्मा शोमधून काढून टाकले होते. त्यानंतर आता पंजाब विधानसभेत अकाली दलाच्या आमदारांनी सिद्धूंच्या विरोधात घोषणा दिल्या.

PulwamaTerror Attack : सोनी चॅनेलनं सिद्धूची केली हकालपट्टी, कपिलच्या शोमध्ये आता नवी एंट्री

सिद्धू यांनी केलेल्या विधानानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. सोनी टिव्हीने देखील त्याची दखल घेत द कपिल शर्मा शोमधून त्यांना काढून टाकले होते. अकाली दलाने आज (सोमवारी) सिद्धूवर हल्ला चढवला. अकाली दलाच्या सदस्यांनी इमरान खान का चमचा सिद्धू हाय हाय अशा घोषणा दिल्या. अकाली दलाच्या सदस्यांनी सिद्धूंच्या विरोधातील घोषणांनी सभागृह दणाणून सोडलो. यातच सिद्धू आणि बिक्रम सिंह मजीठिया यांच्यात तु तु मैं मैं देखील झाले. दोघांनी अपशब्दांचा देखील वापर केला. यामुळे अर्थसंकल्पीय भाषण थांबवण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही नवज्योत सिंग सिद्धू शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला गैरहजर

हा वाद इतक्या टोकाला गेला की भाजप आणि अकाली दलाच्या सदस्यांना सभागृहाबाहेर जाण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदेश द्यावे लागले. जोपर्यंत सुरक्षा जवान सभागृहात येथील त्याच्याआधीच दोन्ही पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला.

दरम्यान, अकाली दलाने सिद्धू यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करावे अशी मागणी केली आहे.

Pulwama Encounter: 'बाबा तुमची वाट पाहत आहेत; चकमकीत अडथळा आणू नका'

First published: February 18, 2019, 2:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading