मराठी बातम्या /बातम्या /देश /Navjot Singh Sidhu Resigns: ओ गुरू ठोको ताली, नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Navjot Singh Sidhu Resigns: ओ गुरू ठोको ताली, नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Navjot Singh Sidhu Resigns : नवज्योत सिंह सिद्धू यांनी राजीनामा थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे पाठवला आहे.

Navjot Singh Sidhu Resigns : नवज्योत सिंह सिद्धू यांनी राजीनामा थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे पाठवला आहे.

Navjot Singh Sidhu Resigns : नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे पाठवला आहे.

पंजाब, 28 सप्टेंबर : पंजाबमध्ये राजकीय नाट्य अजूनही सुरूच आहे. नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu Resigns) यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचले होते. पण, आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली आहे. सिद्धूंनी आपला राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे पाठवला आहे.

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा थेट त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविला आहे. सिद्धू यांनी राजीनामा दिल्यामुळे पंजाब (punjab congress) काँग्रेसमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

परीक्षांचा आता नवा घोळ; आरोग्य विभाग आणि शिक्षक पात्रता परीक्षा एकाच दिवशी

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नवज्योत सिंह सिद्धू यांचं नाव चर्चेत होतं. खुद्ध सिद्धू यांनाच मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. पण, काँग्रेसमधील वरिष्ठांनी सिद्धूंच्या स्वप्नावर पाणी फेरले.

स्नेहा भडकली मीनलवर! म्हणाली, 'Bigg Boss Marathi च्या घरात माझ्या एवढं कोणीच...'

अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच झाली. अनेक नावं चर्चेत आली. पण  चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. काँग्रेसच्या हायकमांडकडून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केली आणि पदभारही सोपवला आहे. चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसमधील नाराजीनाट्यावर पडदा पडेल अशी शक्यता होती, पण आता सिद्धू यांनी राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे. सिद्धू यांनी राजीनामा देऊन एका प्रकारे पक्षावर दबाव टाकल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे सिद्धू यांचा राजीनामा स्विकारला जातो की नवीन काही जबाबदारी दिली जाते हे पाहण्याचं ठरणार आहे.

First published:
top videos