करतारपूर कॉरिडॉरचं भूमिपूजन, बहुत हुआ खूनखराबा, अब बढ़े भाईचारा - सिद्धू

करतारपूर कॉरिडॉरचं भूमिपूजन, बहुत हुआ खूनखराबा, अब बढ़े भाईचारा - सिद्धू

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेल इम्रान खान आणि सिद्धू याच जुनं नातं आहे.

  • Share this:

करतारपूर (पाकिस्तान) 28 नोव्हेंबर : भारत आणि पाकिस्तामधल्या शिख धर्मस्थळांना जोडणाऱ्या महामार्गाचं 'करतारपूर कॉरिडॉर' बुधवारी पाकिस्तानात भूमिपूजन झालं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हे भूमिपूजन केलं. यावेळी भारताकडून केंद्रीय मंत्री हरसीमरन कौर बादल आणि हरदीप पुरी उपस्थित होते. तर पंजबाचे मंत्री नज्योतसिंग सिद्धू खासगी निमंत्रणावर तिथे गेले होते. यावेळी बोलताना सिद्धू यांनी आपल्या शेरो शायरीने धम्माल केली. सिद्धू म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण व्हावी. बहुत हुआ खूनखराबा, अब बढ़े भाईचारा.


भारतातल्या पंजाबमधल्या गुरूदासपूर जिल्ह्यातल्या डेरा बाबा नानक या स्थानापासून ते पाकिस्तानातल्या पंजाबमधल्या करतारपूर साहेब यांना महामार्गाने जाडण्यात येणार आहे. त्या मार्गाला 'करतारपूर कॉरिडॉर' असं नाव देण्यात आलंय. ही दोनही स्थानं शीख धर्मियांसाठी अतिशय पवित्र समजली जातात.


गेल्या अनेक दशकांपासून 'करतारपूर कॉरिडॉर'साठी शिख बांधव मागणी करत होते. काही दिवसांपूर्वीच या कॉरिडॉरला केंद्र सरकारनं मान्यता दिली. तर पाकिस्तान सरकारनेही या प्रकल्पाला मान्यता दिलीय. भारतातल्या पंजाब मधल्या गुरूदासपूर आणि पाकिस्तानातल्या पंजाब मधल्या करतारपूरला महामार्गने जोडण्यात येणार आहे. त्यामुळं व्हिसा न घेताही दोन्ही देशांचे भाविक ये जा करू शकणार आहेत.


पाकिस्तान आणि भारतात शांतता निर्माण व्हावी यासाठीच सिद्धू प्रयत्न करत आहेत. त्यामुळं त्यांच्या पाकिस्तानभेटीवर येवढी टीका का झाली तेच कळत नाही असं इम्रान खान म्हणाले. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेल इम्रान खान आणि सिद्धू याच जुनं नातं आहे.


'करतारपूरचं' काय आहे महत्त्व?


पाकिस्तानातल्या पंजाबमध्ये करतारपूर साहेब हा गुरूव्दारा आहे. रावी नदीच्या काठावर असलेला हा गुरूद्वारा शीख धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आहे. लाहोरपासून हे ठिकाण 120 किमी अंतरावर आहे. तर भारतीय सीवेवरून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर आहे.


शिख धर्मियांचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांनी आपल्या आयुष्यातली 18 वर्ष या ठिकाणी व्यतित केली होती. त्यांचं निधनही याच ठिकाणी झालं होतं. त्या ठिकाणी आता गुरूद्वारा बाधण्यात आला. त्यालाच गुरूद्वारा करतारपूर साहेब असं म्हणतात.


 


 


 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 05:46 PM IST

ताज्या बातम्या