Home /News /national /

Lockdownमुळे झाली आयुष्याची फरपट, राष्ट्रीय महिला फुटबॉलपटूवर लोकांचे कपडे धुण्याची वेळ

Lockdownमुळे झाली आयुष्याची फरपट, राष्ट्रीय महिला फुटबॉलपटूवर लोकांचे कपडे धुण्याची वेळ

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. मात्र सरकारकडून अद्यापही मदतीचा हात पुढे आलेला नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

    पटना 25 जुलै: कोरोनाची साथ आणि नंतरच्या Lockdownमुळे देशाचं अर्थचक्र मंदावलं आहे. लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला. यात सर्वात जास्त फटका बसला तो गरिबांना. यात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले सर्वच घटक भरडले गेले आहे. राष्ट्रीय स्तरावर महिलांच्या फुटबॉलसंघात खेळणाऱ्या मोना कुमारी या फुटबॉलपटूला लॉकडाऊनमुळे आता दुसऱ्यांचे कपडे धुण्याची वेळ आली आहे. बिहारच्या पश्चमी चम्पारण जिल्ह्यातल्या नरकटियागंज (Narkatiaganj)मध्ये मोना कुमारी राहते. पण लॉकडाऊनमुळे तिच्या कुटुंबावरच आर्थिक संकट कोसळलं आहे. तिच्या वडिलांचा कपड्यांना इस्त्री करण्याचा पारंपारिक व्यवसाय आहे. कोरोनामुळे सततचा बंद आणि लोकच येत नसल्यामुळे कमाई कमी होतेय. त्यामुळे वडिलांच्या मदतीला मोना कुमारी आली असून तिही आता वडिलांसोबत नदीवर जात कपडे धुण्याचं काम करत आहे. या कामामुळे तिच्या सरावावर परिणाम होत आहे. पण असं असतांनाही सकाळच्या वेळेत आपण घरातच सराव करत असल्याचं तिने सांगितलं. मोना कुमारी दोन वेळा राष्ट्रीय संघात निवडली गेली होती. 2018मध्ये आसाममधल्या दिब्रुगढ इथं आणि 2019मध्ये ओरिसातल्या कटकमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने उत्तम कामगिरी केली होती. ...म्हणून बॉलिवूडमध्ये मला काम मिळत नाही; ऑस्कर विजेता ए.आर.रेहमान यांचा खुलासा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. तिच्या परिस्थिती माहिती बाहेर आल्यानंतर अनेकांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र सरकारकडून अद्यापही मदतीचा हात पुढे आलेला नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. सुपरस्टार पवन कल्याणच्या फॅन्सचा राडा, राम गोपाल वर्मांच्या ऑफिसवर दगडफेक मोना कुमारीने बिहारचं नाव देशात उज्वल केलं त्यामुळे तिला मदत करावी असं लोकांना वाटतं. अशा खेळाडूंना मदत केली तर देशालाच त्याचा फायदा होते. या कामांमुळे तिचं खेळावरचं लक्षं उडालं तर ती चांगला खेळ खेळू शकणार नाही अशी चिंताही अनेकांनी व्यक्त केली.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या