Home /News /national /

NEET 2020 Exam Result: आशिष जांते महाराष्ट्रात पहिला, शोएबने मारली देशात बाजी

NEET 2020 Exam Result: आशिष जांते महाराष्ट्रात पहिला, शोएबने मारली देशात बाजी

परीक्षेसाठी 15,97,435 एवढ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातल्या 13,66,945 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 7,71,500 एवढे विद्यार्थी पास झालेत.

    नवी दिल्ली 16 ऑक्टोबर: कोरोनामुळे गाजलेल्या NEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ओडिशाच्या शोएब अफताब हा विद्यार्थी देशात पहिला आला असून त्याला 99.99 टक्के एवढे मार्क्स मिळाले आहेत. तर महाराष्ट्रात आशिष जांते पहिला आला आहे. आशिषलाही 99 टक्के मिळाले आहे. परीक्षेसाठी 15,97,435 एवढ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातल्या 13,66,945 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 7,71,500 एवढे विद्यार्थी पास झालेत. NEET cut-off 2020 असा आहे. UR : 720-147 OBC : 146-113 SC : 146-113 ST : 146-113 UR/EWS &PH : 146-129 OBC & PH : 128-113 SC & PH : 128-113 ST & PH : 128-113 ही आहे पहिल्या टॉपर्सची यादी कोरोनामुळे परीक्षा घ्याव्यात की नाही याची चर्चा सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाने NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली होती. कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा घेणे धोकादायक होऊ शकते त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी एका याचिकेत करण्यात आली होती. मात्र आता परीक्षा घेताना सर्व काळजी घेतली जाईल असा दावा नॅशनल टेस्टिंग एजेंसीने कोर्टात केल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळण्यात  आला आणि देशभर परीक्षा सुरळीत पार पडली.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या