सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गिफ्ट, पेन्शन योजनेबद्दल घेतला हा निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गिफ्ट, पेन्शन योजनेबद्दल घेतला हा निर्णय

एनपीएसमध्ये असलेल्या या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन स्कीमबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत सरकारने नॅशनल पेन्शन स्कीममध्ये  असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन स्कीममध्ये नाव नोंद करण्यासाठी सूट दिली आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2004 किंवा त्याआधी जे केंद्रीय कर्मचारी नोकरीला लागले आहेत त्यांनाच जुन्या पेन्शन योजनेचा फायदा होणार आहे. त्यांची नियुक्ती जरी या तारखेनंतर झाली असली तरी जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल.

जुनी पेन्शन ओपीएस अशी योजना आहे ज्यामध्ये पेन्शन निवृत्त होण्यापूर्वी घेतलेल्या शेवटच्या वेतनावर ठरत होती. ओपीएसमध्ये महागाई दर वाढल्यानंतर महागाई भत्ताही वाढवला जात होता. जेव्हा सरकार नवीन वेतन आयोग लागू करतं तेव्हा पेन्शनमध्येही वाढ होते. केंद्रात ओपीएसला 1 जानेवारी 2004 मध्ये लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.

सरकारी नोकरीची भरती किंवा निकाल 1 जानेवारी 2004 च्या आधी लागला असेल आणि नियुक्ती, पोलिस चौकशी, पडताळणी, आरोग्य तपासणी आदी गोष्टी उशिराने झाल्या असल्यास त्याला सरकारी कर्मचारी जबाबदार नाही. ही प्रशासनातील त्रुटी आहे. यासाठी अशा कर्मचाऱ्यांना वन टाइम ऑप्शन दिला जात आहे. पेन्शन विभागाला याबाबत माहिती देऊन जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी सरकारने 31 मे 2020 पर्यंत मुदत दिली आहे.

जुन्या पेन्शन योजेत जास्त फायदा आहे कारण यात पेन्शनरसह त्याचं कुटुंबिय सुरक्षित राहतं. जर कर्मचाऱ्यांना ओपीएसचा फायदा मिळाला तर रिटायरमेंट सुरक्षित होईल. ओपीएसला पात्र ठरल्यानंतर कर्मचाऱ्यांचे एनपीएस खातं बंद करण्यात येईल. याबाबत सरकारने सर्व विभागांना आदेश दिले आहेत.

सरकारने 1 जानेवारी 2004 रोजी नवीन पेन्शन योजना लागू केली. सुरुवातीला काही राज्यात एप्रिल 2004 पासून लागू झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे पेन्शन आणि कुटुंबाला पेन्शन मिळण्याचे फायदे नाहीत. यात कर्मचाऱ्यांचे वेतन आणि महागाई भत्ता यातील 10 टक्के रक्कम घेतली जाते तर सरकारकडून 14 टक्के रक्कम दिली जाते.

SBI देतंय स्वस्त घर आणि दुकान खरेदीची संधी, उरला अगदी कमी अवधी

केंद्राने लागू केलेल्या नव्या पेन्शन योजनेच्या फंडासाठी वेगळी खाती उघडण्यात आली. त्यात गुंतवणुकीसाठी फंड मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली होती. पेन्शन फंडाची गुंतवणूक शेअर बाजारात, बॉन्डमध्ये केल्यानंतर त्याचा परतावा चांगला राहिला तर जुन्या पेन्शन योजनेपेक्षा जास्त फायदा नव्या पेन्शन योजनेत मिळतो. मात्र परतावा चांगला मिळेल हे आधीच कसं सांगता येईल. पैसे बुडाले तर कर्मचाऱ्याचेच नुकसान होईल म्हणून एनपीएसला विरोध केला जात आहे.

मोठी बातमी! 31 मार्चच्या नंतरही PAN आणि आधार कार्ड करू शकता लिंक, ही आहे अट

First published: February 18, 2020, 9:11 PM IST
Tags: nps

ताज्या बातम्या